ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाने शुक्रवारी दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवला. भारताने 7 विकेट राखून यजमान न्यूझीलंडला नमवले आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. ऑकलंड येथे झालेल्या या सामन्यात महेंद्रसिंग धोनीनं मारलेला एक फटका भल्याभल्यांना चक्रावणारा ठरला. धोनीनं हा फटका किवी गोलंदाज इश सोढी याचा डाव फसवा म्हणून मारला. त्यानंतर सोशल मीडियावर धोनीच्याच नावाची चर्चा रंगली.
दुसऱ्या सामन्यात भारताच्या डावात 16 व्या षटकात सोढी गोलंदाजीसाठी आला. सोढीने चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकला आणि त्यावर मोठा फटका मारण्यासाठी धोनी पुढे आला. पण, चेंडूच्या वेगाचा अंदाज घेताना धोनी थोडा चाचपडला, परंतु लगेच त्याने चक्रावणारा फटका खेळून चेंडू यष्टिरक्षकाकडे जाण्यापासून रोखला.
धोनीनं याआधीची यष्टिचीत होण्यापासून वाचण्यासाठी अनेक युक्त्या लढवल्या आहेत. 2017च्या न्यूझीलंडविरुद्धच्या एका ट्वेंटी-20 सामन्यात धोनी यष्टिचीत होण्यापासून वाचण्यासाठी पूर्णपणे स्ट्रेच झाला होता. राजकोट येथील त्या सामन्यात धोनीच्या तंदुरुस्तीची झलक पाहायला मिळाली होती.
![]()
ऑकलंड येथे झालेल्या ट्वेंटी-20 सामन्यात धोनीने 17 चेंडूंत नाबाद 20 धावा केल्या. धोनी आणि रिषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 44 धावांची भागीदारी केली होती.