Join us  

NZ vIND : Team India ला मोठा धक्का; वन डे, कसोटी मालिकेतून प्रमुख खेळाडूची माघार

भारतीय संघानं पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवताना न्यूझीलंडवर 5-0 असा दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 3:26 PM

Open in App

भारतीय संघानं पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवताना न्यूझीलंडवर 5-0 असा दणदणीत विजय मिळवला. भारतानं फलंदाजी अन् गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी करताना किवी संघाची दाणादाण उडवली. त्यात भारतीय गोलंदाजांनी दोन सामन्यात किवींच्या तोंडचा घास पळवताना सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिला. ट्वेंटी-20 मालिकेनंतर टीम इंडिया आता तीन सामन्यांची वन डे आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाली आहे. 5 फेब्रुवारीला पहिला वन डे सामना खेळवण्यात येणार आहे. पण, या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसण्याचे संकेत मिळत आहे. या मालिकेतून टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू माघार घेणार असल्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत.

भारतीय खेळाडूंच्या दुखापतीचे सत्र कायम राहतानाचे दिसत आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाचा प्रमुख सलामीवीर शिखर धवन याने माघार घेतली. त्यानंतर हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण, तो अजूनही पुर्णपणे तंदुरूस्त झाला नसल्यानं त्याचेही कमबॅक लांबणीवर पडले आहे. त्यात आणखी एकाची भर पडली आहे. हा असा खेळाडू आहे की ज्यानं आपल्या फटकेबाजीनं किवी गोलंदाजांची झोप उडवली. शिवाय क्षेत्ररक्षणातही त्याची कामगिरी कौतुकास्पद झाली होती. 

भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हार्दिक पांड्या, शिखर धवन ही दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी आणखी वाढताना दिसत आहे. पृथ्वी शॉनं दुखापतीतून कमबॅक केले असले तरी राष्ट्रीय संघात अजून त्याला खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण, आता आणखी एका खेळाडूनं माघार घेतल्यास पृथ्वीला वन डे मालिकेत पुनरागमनाची संधी मिळू शकते. भारताच्या या जखमी खेळाडूंमध्ये नव्यानं दाखल झालेल्या फलंदाजानं किवींविरुद्ध दोन दमदार अर्धशतकं झळकावली होती. शिवाय सुपर ओव्हरमधील त्याच्या फटकेबाजीनं संघाला विजयही मिळवून दिला होता. त्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या खेळाडूनं वन डे आणि कसोटी मालिकेतून माघार घेतल्यास, टीम इंडियाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या मालिकेत लोकेश राहुल फलंदाज आणि यष्टिरक्षक अशा दुहेरी भूमिकेत होता. या दोन्ही भूमिका त्यानं चोख पार पाडल्या. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये लोकेश अव्वल स्थानी आहे. त्यानं 56 च्या सरासरीनं 2 अर्धशतकांसह 224 धावा चोपल्या. विशेष म्हणजे या मालिकेतून दोनशेहून अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. लोकेशनंतर जर कोणाची बॅट तळपली असेल तर ती हिटमॅन रोहित शर्माची... त्यानं चार ट्वेंटी-20 सामन्यांत दोन अर्धशतकं झळकावली. पण, पाचव्या सामन्यात रोहितच्या खांद्याला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावं लागलं. रोहितनं त्या सामन्यात 41 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार खेचून 60 धावा चोपल्या. पण, दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले. आता सूत्रांच्या माहितीनुसार रोहित वन डे आणि कसोटी मालिकेतून माघार घेण्याची शक्यता आहे.

वन डे भारत विरुद्ध न्यूझीलंड - 5 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.भारत विरुद्ध न्यूझीलंड - 8 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.भारत विरुद्ध न्यूझीलंड - 11 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.    कसोटीभारत विरुद्ध न्यूझीलंड - 21 ते 25 फेब्रुवारी, पहाटे 4 वा.भारत विरुद्ध न्यूझीलंड - 29 फेब्रुवारी ते 4 मार्च, पहाटे 4 वा.

लोकेश राहुलचा एक्स्ट्रा कव्हरवरून षटकार अन् विंडीज दिग्गजाचं बेस्ट ट्विट!

Video : सचिन तेंडुलकरचं 'चॅलेंज' विनोद कांबळीनं केलं पूर्ण

पाकिस्तानमध्ये येऊन खेळा, शाहिद आफ्रिदीचं टीम इंडियाला चॅलेंज!

विराट कोहली अन् इम्रान खान यांच्यात साम्य; संजय मांजरेकरचं विधान

प्रयोग केला, धडपडलो अन् जिंकलो; दोन 'सुपर' विजयांमधून काय बरं शिकलो?

विराट काढतोय एका चेंडूत दोन विकेट?; लोकेशला यष्टीमागे उभं करण्यामागे 'सिक्रेट गेम'

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्मालोकेश राहुलविराट कोहलीहार्दिक पांड्याशिखर धवनभुवनेश्वर कुमार