नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट : स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांच्या अविश्वसनीय कामगिरीच्या जोरावर भारतीय महिलांनी विजय मिळवला. न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्याच वन डे सामन्यात भारताने यजमानांवर 9 विकेट व 102 चेंडू राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडच्या 192 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृतीने खणखणीत शतक झळकावले, तर जेमिमाने नाबाद 81 धावांची खेळी साकारली. 2018 वर्षात आयसीसीच्या सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकणाऱ्या स्मृतीचे हे कारकिर्दीतील चौथे शतक ठरले. या शतकाबरोबर तिने आतापर्यंत एकाही भारतीय महिला फलंदाजाला न जमलेला विक्रम करून दाखवला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs New Zealand ODI : स्मृतीचा 'SENA' देशांत पराक्रम, 'हा' विक्रम करणारी पहिलीच भारतीय
India vs New Zealand ODI : स्मृतीचा 'SENA' देशांत पराक्रम, 'हा' विक्रम करणारी पहिलीच भारतीय
India vs New Zealand ODI: स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांच्या अविश्वसनीय कामगिरीच्या जोरावर भारतीय महिलांनी विजय मिळवला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 13:58 IST
India vs New Zealand ODI : स्मृतीचा 'SENA' देशांत पराक्रम, 'हा' विक्रम करणारी पहिलीच भारतीय
ठळक मुद्देस्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांची अविश्वसनीय कामगिरीभारतीय महिलांचा न्यूझीलंडवर 9 विकेट राखून विजयस्मृती मानधनाचे वन डे कारकिर्दीतील चौथे शतक