माऊंट माऊंगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट : तब्बल 24 वर्षांनी भारतीय महिला संघाने न्यूझीलंडच्या भूमीत वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. भारतीय पुरुष संघाने दहा वर्षांनी न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकली, तर महिलांना हा पराक्रम करण्यासाठी 24 वर्षे वाट पाहावी लागली. भारतीय महिलांनी मंगळवारी झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात 8 विकेट राखून विजय मिळवला. या विजयाबरोबर महिला संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताने 35.2 षटकातं 2 बाद 166 धावा करत विजय मिळवला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs New Zealand ODI : भारताच्या पोरी हुश्शार... न्यूझीलंडमध्ये 24 वर्षांनी जिंकली वन डे मालिका
India vs New Zealand ODI : भारताच्या पोरी हुश्शार... न्यूझीलंडमध्ये 24 वर्षांनी जिंकली वन डे मालिका
India vs New Zealand ODI: तब्बल 24 वर्षांनी भारतीय महिला संघाने न्यूझीलंडच्या भूमीत वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 12:49 IST
India vs New Zealand ODI : भारताच्या पोरी हुश्शार... न्यूझीलंडमध्ये 24 वर्षांनी जिंकली वन डे मालिका
ठळक मुद्देभारतीय महिलांची वन डे मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी1995 नंतर न्यूझीलंडमध्ये प्रथमच जिंकली वन डे मालिकास्मृती मानधनाच्या नाबाद 90, तर मिताली राजच्या नाबाद 59 धावा