भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर करण्यात आले आहेत. यावेळी भारताच्या संघात दोन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आता हे दोन खेळाडू मिळालेल्या संधीचे किती सानं करतात, याकडे सर्वांचं लक्ष असेल.
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात दोन खेळाडूंना संधी मिळू शकते, असे संकेत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले होते. शास्त्री यांनी सांगितल्यानुसार भारतीय संघात या सामन्यासाठी उमेश यादवची निवड करण्यात आली आहे. कारण भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे इशांतच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादवला संघात स्थान देण्यात आले आहे.

या सामन्याच्या सराव सत्रामध्ये भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याला दुखापत झाली होती. पण शास्त्री यांनी तो या सामन्यासाठी फिट असल्याचे सांगितले आहे. पण आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यामध्ये कोणाला संघात स्थान मिळेल, याबाबत चांगलीच चर्चा रंगत होती. पण शास्त्री यांनी दिलेल्या संकेतांनुसार या सामन्यासाठी जडेजाला संधी मिळू शकते. त्यानुसार या सामन्यासाठी जडेजाला संघात स्थान देण्यात आले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शनिवारपासून ख्राईस्टचर्च येथे खेळवला जात आहे. या सामन्यात विजय मिळून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. मात्र सामन्याच्या ऐन पूर्वसंध्येला भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा आघाडीचा गोलंदाज इशांत शर्माच्या दुखापतीने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने तो दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. दरम्यान, इशांतच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादवला भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
![India vs New Zealand, 2nd Test: For the second Test, this is the Indian team; Two players can get the chance prl | India vs New Zealand, 2nd Test : दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी असा असेल भारतीय संघ; दोन खेळाडूंना मिळू शकते संधी]()
रणजी करंडक स्पर्धेत खेळताना इशांत शर्माच्या उजव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून सावरत तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला होता. तसेच त्याने पहिल्या कसोटीत भेदक गोलंदाजी करत पाच बळीही टिपले होते. मात्र भारतीय संघासाठी मालिकेत करो वा मरो ची स्थिती असतानाच इशांतच्या उजव्या पायाच्या घोट्याच्या दुखापतीने डोके वर काढले आहे.