India vs New Zealand Live Streaming 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. नव्या वर्षातील दोन्ही संघातील पहिली एकदिवसीय द्विपक्षीय मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. गत वर्षी भारताविरुद्ध मिळवलेल्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजय सोडला तर न्यूझीलंडच्या संघाने भारतीय मैदानात टीम इंडियाविरुद्ध एकही मालिका जिंकलेली नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय संघासाठी जमेची बाजू
इंदूरच्या होळकर मैदानात आतापर्यंत टीम इंडियाने ५ वनडे सामने खेळले आहेत. यातील एकही सामना भारतीय संघाने गमावलेला नाही. बालेकिल्ल्यातील दबदबा कायम राखत टीम इंडिया सहाव्या विजयासह मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दुसरीकडे कसोटीनंतर न्यूझीलंडचा संघ वनडेत इतिहास रचण्यासाठी जोर लावेल. इथं एक नजर टाकुयात हा निर्णयाक सामना कधी अन् कुठं रंगणार? कसा पाहता येईल या दोन्ही संघातील वनडेचा थरार यासंदर्भातील माहिती
India Squad vs Australia : एकाच वेळी टीम इंडियाचे दोन संघ जाहीर! या खेळाडूला ७ वर्षांनी कमबॅकची संधी
हिटमॅन रोहितच्या हिट शोसह किंग कोहलीच्या 'विराट' फॉर्मवर असतील नजरा
रोहित शर्मा पहिल्या दोन सामन्यात मोठा धमाका करण्यात अपयशी ठरला आहे. आक्रमक अंदाजात बॅटिंग करण्याऐवजी संयमी पवित्रा घेत त्याने दोन्ही वेळी चांगली सुरुवात केली, पण मोठी धावसंख्या करण्यात तो अपयशी ठरला. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात तो तुफान फटकेबाजी करेल, अशी अपेक्षा आहे. होळकर स्टेडियमची बाउंड्रीचे अंतर कमी असल्यामुळे रोहितसाठी ती जमेची बाजू ठरेल. याशिवाय सलग पाच वेळा फिफ्टी प्लसचा डाव साधल्यावर विराट कोहली दुसऱ्या वनडेत स्वस्तात माघारी फिरला होता. फिफ्टी प्लसचा सिक्सर हुकल्यावर तो निर्णायक सामन्यातील दमदार खेळीसह होळकर स्टेडियमवर टीम इंडियाला विजयी षटकार मारून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणार का? तेही पाहण्याजोगे असेल.
कधी आणि कुठं रगणार सामना?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि निर्णयाक वनडे सामना १८ जानेवारी, २०२६ रोजी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी १ वाजता दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. १ वाजून ३० मिनिटांनी या सामन्यातील पहिला चेंडू फेकला जाईल.
IND vs NZ तिसरा वनडे सामना कुठे पाहता येईल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा वनडे सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रेक्षेपित केला जाईल. याशिवाय क्रिकेट चाहत्यांसाठी जिओहॉटस्टारवर सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग उपलब्ध असेल.
भारत (संभाव्य XI):
रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक/फलंदाज), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड (संभाव्य XI):
डेवॉनन कॉन्वे, विल यंग, हेन्री निकोल्स, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅक फॉल्क्स, जोश क्लार्कसन, जेडन लेनॉक्स, कायले जेमिसन, क्रिस्टियन क्लर्क.