Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NZ 2nd T20I : जसप्रीत बुमराह प्लेइंग इलेव्हनमधून OUT; कारण काय? सूर्या म्हणाला...

नागपूरच्या मैदानातील पहिल्या टी-२० सामन्यात जसप्रीत बुमराहनं ३ षटके गोलंदाजी केली. पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 18:57 IST

Open in App

India vs New Zealand, 2nd T20I : न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूरच्या मैदानात दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघ दोन बदलासह मैदानात उतरला आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर सूर्यकुमार यादवनं प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहशिवाय मैदानात उतरणार असल्याची गोष्ट  सांगितली. याशिवाय दुखापतीमुळे अक्षर पटेलच्या जागी प्रमुख फिरकीपटूची टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दुसऱ्या टी-२० सामन्यात दोन बदलासह मैदानात उतरली टीम इंडिया 

नाणेफेकीनंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, पहिल्या सामन्यातील दुखापतीमुळे अक्षर पटेल या सामन्यात खेळणार नाही. त्याच्याऐवजी कुलदीप यादवला संघात संधी देण्यात आली आहे. याशिवाय जसप्रीत बुमराहला विश्रांती देऊन हर्षित राणासह मैदानात उतरत असल्याचे त्याने स्पष्ट केले. नागपूरच्या मैदानातील पहिल्या टी-२० सामन्यात जसप्रीत बुमराहनं ३ षटके गोलंदाजी केली. २९ धावा खर्च करुन त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. दुसऱ्या सामन्यात तो छाप पाडणार का? अशी चर्चा रंगत असताना त्याला विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.

T20 World Cup 2026: बांगलादेश टी-२० विश्वचषकात सहभागी न झाल्यास भारताचे किती नुकसान होईल?

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.न्यूझीलंड  प्लेइंग इलेव्हन :

डेवॉन  कॉन्वे, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर (कर्णधार), झकरी फॉल्केस, मॅट हेन्री, ईश सोधी, जेकब डफी. 

English
हिंदी सारांश
Web Title : IND vs NZ T20I: Bumrah OUT; Surya Reveals Reason, Changes Announced

Web Summary : India faces New Zealand with two changes. Bumrah is rested, and Axar Patel is injured. Kuldeep Yadav and Harshit Rana replace them in the playing eleven. Surya revealed the changes after winning the toss.