२५ वर्षांनंतर हिशेब चुकता करण्याची संधी; पराभवाचा वचपा काढून चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याची वेळ

नैरोबीत २००० ला झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने केला होता भारतीय संघाचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 06:31 IST2025-03-09T06:31:44+5:302025-03-09T06:31:58+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand Indian team gets a chance to lift the Champions Trophy after 25 years | २५ वर्षांनंतर हिशेब चुकता करण्याची संधी; पराभवाचा वचपा काढून चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याची वेळ

२५ वर्षांनंतर हिशेब चुकता करण्याची संधी; पराभवाचा वचपा काढून चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याची वेळ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अयाज मेमन (कन्सल्टिंग एडिटर)

१५ ऑक्टोबर २००० चा तो दिवस, स्थळ होते नैरोबी, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सौरव गांगुलीच्या भारतीय संघाला स्टीफन फ्लेमिंगच्या न्यूझीलंडने ४ गड्धांनी धूळ चारली होती, त्या घटनेला २५ वर्षे झाली. आज रविवार, ९ मार्च २०२५ ला त्या पराभवाचा वचपा काढून पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याची वेळ आली आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मिचेल सेंटनरच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडविरुद्ध फायनल खेळेल तेव्हा आवसीसी स्पर्धेत भारतावर वरचष्मा गाजविणाऱ्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध मुळीच गाफील राहू नये.

भारताने याआधी २०१३ ला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा मान मिळविला होता, त्यानंतर निर्माण झालेला जेतेपदाचा दुष्काळ संपविण्याचीदेखील हीच योग्य वेळ आहे. २०१९ च्या वनडे विश्वविजेतेपदापासून भारत दूर राहिला तो न्यूझीलंडमुळेच. या संघाने भारताला उपांत्य फेरीत लोळवून स्वप्नभंग केला होता. भारताने या पराभवाचा वचपा नंतर २०२३ च्या वनडे विश्वचषकात न्यूझीलंडला उपांत्य सामन्यातच नमवून काढला. त्याआधी २०२१ च्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये मात्र फायनलमध्ये भारत न्यूझीलंडकडून पराभूत झाला, मागच्यावर्षी कसोटी मालिकेतही न्यूझीलंडने भारताला भारतात ३-० ने 'क्लीन स्विप' दिला.

या स्पर्धेबाबत सांगायचे झाल्यास दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांची आघाडीची फलंदाजीही चरचढ आहे. शानदार फॉर्ममध्ये असलेला विराट कोहली आणि केन विल्यमसन आपापल्या संघांसाठी हुकमी एक्का आहेत. पडझड झाल्यानंतर दोघेही मोठी खेळी करण्याची क्षमता बाळगतात.

दोन्ही संघांचे फिरकी गोलंदाज भेदक असल्याने मधल्या षटकांमध्ये उत्कृष्ट मारा करून सामन्यात चुरस आणू शकतात, फायनलमध्ये नाणेफेक महत्याची ठरणार. खेळपट्टीचे स्वरूप बघता आधी फलंदाजी घेणाऱ्या संघाला लाभ होऊ शकतो. तरीही न्यूझीलंडला सहज घेता येणार नाही, हेदेखील ध्यानात ठेवावे लागेल.

२०२३ चे स्वप्न साकारणार? 

भारताने २०२३ ला स्वतःच्या यजमानपदाखाली वनडे विश्वचषकाचे आयोजन केले. सर्व सामने जिंकूनदेखील फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून एकतर्फी पराभवामुळे जेतेपद हिरावले गेले. आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून ती पोकळी भरून काढता येईल. पांढऱ्या चेंडूच्या खेळात भारत बलाबच आहे. याच कारणास्तव कागदावर तरी भारत न्यूझीलंडच्या तुलनेत वरचढ ठरतो.

यांच्यावर असेल लक्ष...

भारत:  रोहित शर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, लोकेश राहुल 

न्यूझीलंड: रचिन रवींद्र, केन विल्यमसन, मिचेल सेंटनर, ग्लेन फिलिप्स

रोहितच्या नेतृत्वात आयसीसी सामने 
३१  सामने
२६ विजय
४  पराभव
१  टाय

बलाबल

भारत

१) अनुभवी खेळाडूंचा भरणा 
२) चॅम्पियन्स ट्रॉफीत एकही सामना गमावला नाही.
३) चॅम्पियन्स ट्रॉफीआधी इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकली. वनडेत भारत सध्यातरी अपराजित आहे. 
४) कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माची बॅट शांत असली तरी तो 'आउट ऑफ फॉर्म' नाही. 
५) मागध्या दोन सामन्यांचा अपवाद वगळता शुभमन गिलनेदेखील योगदान दिले. 
६) विराट कोहली फॉर्ममध्ये परतला. श्रेयस अय्यर हादेखील मोठी खेळी करीत आहे. 
७) लोकेश राहुल- रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या- अक्षर पटेल यांच्यामुळे फलंदाजी फारच भक्कम झाली.
८) जडेजा, पटेल आणि कुलदीप यादव है डावखुरे फिरकी गोलंदाज असल्याने भारतासाठी ही जमेची बाब आहे.
१) मोहम्मद शमी या अनुभवी वेगवान गोलंदाजाने आधाडीच्या फळीला धक्के दिल्यास फिरकीपटू आपली भूमिका चोखपणे बजावतील,

न्यूझीलंड

१) पाकिस्तानातील तिरंगी मालिकेत हा संघ विजेता ठरला होता. 
२) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका सामन्यात अर्थात भारताविरुद्ध पराभव पदरी पडला. 
३) रचिन रवींद्र याची तुलना शुभमनसोबत होते. त्याने स्पर्धेत दोन शतके ठोकली. 
४) केन विल्यमसन याची तुलना विराट कोहलीशी होते. दोघेही कमालीच्या फॉर्ममध्ये आहेत.
५) टॉम लैथम, डेरिल मिचेल यांच्यासह ग्लेन फिलिप्स फलंदाजीत उपयुक्त योगदान देत आहेत.
६) कर्णधार आणि फिरकीपटू मिचेल सैंटनर हा सध्या जागतिक क्रिकेटमध्ये चेंडूला वळण देणारा सर्वोत्कृष्ट फिरकीपटू
७) रविन रवींद्र, मायकेल ब्रेसवेल आणि ग्लेन फिलिप्स हेदेखील फिरकीत भेदक ठरतात.
८) न्यूझीलंडकडे दोन पार्टटाइम फिरकी गोलंदाज आहेत. ही संघाची उणीव म्हणता येईल.
९) जखमी वेगवान गोलंदाज मेंट हेन्री याच्या खेळण्याबाबत शंका आहे.
 

Web Title: India vs New Zealand Indian team gets a chance to lift the Champions Trophy after 25 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.