Join us

India vs New Zealand 1st ODI : कुलदीप यादवचा अफलातून कॅच पाहिलात का, Video

India vs New Zealand First ODI: भारतीय गोलंदाजांनी नेपियर वन डे सामन्यात यजमान न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगलेच सतावले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 09:47 IST

Open in App

नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय गोलंदाजांनी नेपियर वन डे सामन्यात यजमान न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगलेच सतावले. मोहम्मद शमीच्या धमाकेदार सुरुवातीनंतर युजवेंद्र चहलने आपल्या फिरकीच्या तालावर किवी फलंदाजांना नाचवले. किवी कर्णधार केन विलियम्सन आणि हेन्री निकोल्स यांनी किवींचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु पार्ट टाईम गोलंदाज केदार जाधवने ही जोडी फोडली. केदारने निकोल्सला बाद केले, परंतु फिरकीपटू कुलदीप यादवने घेतलेल्या अफलातून झेल सोशल मीडियावर व्हायरल झाला.भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्याच वन डे सामन्यात झोकात सुरुवात केली. नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेले यजमान न्यूझीलंडचे सलामीवीर 18 धावांवर माघारी परतले. जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने भारताला हे यश मिळवून दिले आणि सर्वात जलद 100 विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांचा मान पटकावला. शमीने सामन्याच्या दुसऱ्याच षटकात मार्टिनगुप्तीलचा त्रिफळा उडवला.  पुढच्याच  षटकात त्याने कॉलीन मुन्रोला बाद करून संघाला आणखी एक यश मिळवून दिले.

शमीच्या गोलंदाजीनंतर युजवेंद्र चहलने किवींच्या दोन प्रमुख फलंदाजांना माघारी पाठवले. त्याने रॉस टेलर व टॉम लॅथम यांना स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टीपत भारताला यश मिळवून दिले. त्यानंतर 24व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर जाधवने निकोल्सला बाद केले. मिडविकेटवर उभ्या असलेल्या कुलदीपने हवेत झेपावत हा झेल टिपला.पाहा व्हिडीओ... 

टॅग्स :कुलदीप यादवभारत विरुद्ध न्यूझीलंडकेदार जाधवबीसीसीआय