India vs New Zealand Final : दुबईच्या मैदानात रंगलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्येही टॉस वेळी रोहित शर्माच्या पदरी निराशा आली. न्यूझीलंड कॅप्टन मिचेल सँटनर याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेत टीम इंडियासमोर टार्गेट सेट करण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतीमुळे मॅट हेन्रीशिवाय न्यूझीलंड संघ मैदानात उतरत आहे. दुसरीकडे भारतीय संघ कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'विराट' टेन्शन नाही
भारतीय संघानं टॉस गमावला असला तरी यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टॉस गमावल्यावर पहिली बॅटिंग असो किंवा बॉलिंग टीम इंडियानेच मॅच जिंकली आहे. हाच कित्ता गिरवत तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल. फायनल आधी टीम इंडियाच्या ताफ्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली होती. विराट कोहली नेट प्रॅक्टिस वेळी दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो खेळणार की, नाही याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. पण तो प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे.
अशी आहे दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन- विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (विकेटकीपर), नॅथन स्मिथ, कायले जेमिसन, विल्यम ओरोर्क