Join us

NZ vs IND : यॉर्कर किंग Jasprit Bumrahनं घेतली बॉलिवूडच्या 'Hot' अभिनेत्रीची विकेट

भारतीय संघानं परदेशात जाऊन धमाकाच उडवला. न्यूझीलंडला त्यांच्याच धर्तीवर ट्वेंटी-20 मालिकेत नमवण्याचा पराक्रम आतापर्यंत एकाही भारतीय कर्णधाराला जमला नव्हता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 10:20 IST

Open in App

भारतीय संघानं परदेशात जाऊन धमाकाच उडवला. न्यूझीलंडला त्यांच्याच धर्तीवर ट्वेंटी-20 मालिकेत नमवण्याचा पराक्रम आतापर्यंत एकाही भारतीय कर्णधाराला जमला नव्हता. पण, विराट कोहलीनं किवींच्या देशात ऐतिहासिक विजय मिळवला. प्रथमच एखाद्या संघानं पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत निर्भेळ यश मिळवले आणि हा विक्रम भारताच्या नावावर नोंदवला गेला आहे. या मालिकेत भारतीय संघानं सर्व आघाड्यांवर वर्चस्व गाजवताना किवींनी हतबल केले. मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूर या दोघांनी तर किवींच्या तोंडचा घास पळवला. पण, मालिकेतील पाचव्या सामन्यातील नायक जसप्रीत बुमराहनं बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रीवर भुरळ पाडली.

NZ vs IND : रोहितपाठोपाठ कर्णधाराचीही माघार, पहिल्या दोन सामन्यांना मुकणार

आपल्या हॉट फोटोंमुळे नेहमी चर्चेत राहणारी दिशा पटानीला भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहनं प्रभावीत केले आहे. जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून बुमराह ओळखला जातो आणि क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये त्याचा दबदबा दाखवून दिला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत त्यानं प्रभावी गोलंदाजी करताना इतिहास रचला. ट्वेंटी-20 मालिकेत सात षटकं निर्धाव टाकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्यानं नावावर केला. पाचव्या सामन्या बुमराहनं 12 धावांत 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारताला 163 धावांचे आव्हान राखता आले. 

पाचव्या सामन्यासाठी दिशा स्टार स्टोर्ट्स वाहिनीच्या स्टुडिओत आपल्या आगामी मलंग या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. त्यावेळी तिला भारतीय संघातील मॅच विनर कोण, हा प्रश्न विचारण्यात आला. ती म्हणाली,''मला मॅच विनर खेळाडू निवडायचा आहे, तर मी जसप्रीत बुमराहची निवड करेन. आपल्याकडे असलेल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी तो एक आहे. बुमराहनं किवींची दाणादाण उडवली.'' 

दिशानं फेव्हरिट खेळाडू म्हणून जसप्रीतची निवड केली असली तरी दुसरीकडे बॉलिवूड सुपरस्टार अनील कपूर यांनी आपण विराट कोहलीचे चाहते असल्याचे जाहीर केले. ''विराट कोहली सबका बॉस'' असे अनील कपूर म्हणाला. 

Ind Vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा चेहऱ्यांना संधी 

IND vs NZ : दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या जागी मयांक अग्रवालचा वनडे मालिकेसाठी संघात समावेश

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडजसप्रित बुमराहदिशा पाटनीमलंग