Join us  

भुवनेश्वर कुमार 'या' वर्ल्ड रेकॉर्डपासून फक्त 4 विकेट दूर, New Zealand विरुद्ध करणार कमाल?

भुवनेश्वर कुमारला टी-20 विश्वचषक 2022 मध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. यामुळे न्यूझीलंड दौरा हा त्यांच्यासाठी एखाद्या अग्निपरीक्षेपेक्षा कमी नसेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 2:12 AM

Open in App

T-20 विश्वचषक 2022 नंतर भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीन T-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. टीम इंडियाकडून अनेक दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याने भारतीय संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या हाती आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भुवनेश्वर कुमारने केवळ 4 विकेट घेतल्यात तर तो टी-20 क्रिकेटमध्ये मोठा विक्रम आपल्या नावावर करेल.

भुवनेश्वर कुमार करू शकतो कमाल - भुवनेश्वर कुमारला टी-20 विश्वचषक 2022 मध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. यामुळे न्यूझीलंड दौरा हा त्यांच्यासाठी एखाद्या अग्निपरीक्षेपेक्षा कमी नसेल. त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत चार विकेट घेतल्या तर तो 2022 च्या कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल. यावर्षी भुवनेश्वर कुमारने 30 सामन्यांत 36 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या खालोखाल जोशुआ लिटल आहे. त्याने 26 सामन्यात 39 विकेट घेतल्या आहेत.

टीम इंडियासाठी तीनही फॉरमॅटमध्ये खेळला आहे भुवनेश्वर -भुवनेश्वर कुमार सध्या अतिशय खराब फॉर्मचा सामना करत आहे. तो एक घातक गोलंदाज आहे. विकेटच्या दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करण्यात तो तरबेज आहे. तो भारतासाठी तिन्ही प्रकारच्या फॉरमॅटमध्ये खेळला आहे आणि आपल्या दमावर संघाला अनेक सामनेही जिंकून दिले आहेत. त्याने भारतासाठी 21 कसोटीत 63 विकेट, 121 वनडेमध्ये 141 विकेट्स आणि 85 टी-20 सामन्यांत 89 विकेट्स मिळवल्या आहेत. 

टॅग्स :भुवनेश्वर कुमारभारत विरुद्ध न्यूझीलंडटी-20 क्रिकेट
Open in App