वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड - भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये आज पाचवा वनडे सामना आहे. वेलिंग्टन येथील पाचव्या वन-डेमध्ये भारतानं न्यूझीलंडला 253 धावांचं आव्हान दिले आहे. सामन्यात अंबाती रायडु, हार्दिक पंड्या आणि विजय शंकर या खेळाडूंनी शानदार खेळी खेळली. अंबाती रायडू आणि विजय शंकरनं पार्टनरशिपमध्ये 98 धावा तर केदार जाधवच्या पार्टनरशिपमध्ये 74 धावा केल्या. शेवटी आलेल्या हार्दिकनं 5 षटकार लगावत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अंबाती रायडुनं सर्वाधिक 90 धावा केल्या तर हार्दिक पंड्या विजय शंकरने प्रत्येकी 45-45 धावांचे योगदान दिले.
दरम्यान, भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्यामध्ये विजय शंकर आणि मोहम्मद शमीची संघात पुनरागमन झाले आहे तर दिनेश कार्तिक, खलील अहमद आणि कुलदीप यादवला विश्रांती देण्यात आली आहे.
दरम्यान, भारतीय संघाचा महेंद्रसिंग धोनीच्या पुनरागमनामुळे आत्मविश्वास उंचावला असून, टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या वन-डे लढतीत विजयासह मालिकेचा समारोप करण्यास उत्सुक आहे. भारतानं मालिका यापूर्वीच जिंकली आहे. पण न्यूझीलंड सलग दुसऱ्या विजयासह टी 20 मालिकेपूर्वी आत्मविश्वास उंचावण्यास प्रयत्नशील आहे.
LIVE
Get Latest Updates
03:06 PM
भारताचा न्यूझीलंडवर 35 धावांनी विजय
02:50 PM
न्यूझीलंडला चहलचा तिसरा धक्का
02:31 PM
धोनीची कमाल, केले नीशामला रन आऊट
01:57 PM
चहल चमकला; ग्रँडहोमला धाडले माघारी
01:51 PM
न्यूझीलंडचा अर्धा संघ गारद; 5 बाद 121
01:35 PM
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन बाद
12:37 PM
रॉस टेलर परतला माघारी
12:36 PM
मोहम्मद शमीनं घेतली दुसरी विकेट
12:02 PM
न्यूझीलंडला पहिला धक्का, मोहम्मद शमीने घेतली विकेट
10:59 AM
न्यूझीलंडसमोर 253 धावांचं आव्हान
10:58 AM
कुमार 6 धावांवर बाद
10:55 AM
धडाकेबाज खेळीनंतर हार्दिक पंड्या बाद
10:43 AM
भारताला सातवा झटका, केदार जाधव 34 धावांवर बाद
10:26 AM
अंबाती रायडू 90 धावांवर बाद
10:05 AM
अंबाती रायडूचे 10व्या इंटरनॅशनल वन-डेमधील अर्धशतक
10:04 AM
भारताला पाचवा झटका
08:15 AM
भारताला लागोपाठ चार धक्के, महेंद्रसिंग धोनी बाद
08:02 AM
शुभमन गिल 7 धावांवर बाद
08:01 AM
भारताची दुसरी विकेट, शिखर धवन बाद
07:47 AM
रोहित शर्मा 2 धावांवर बाद
07:28 AM
भारताचा फलंदाजीचा निर्णय
07:27 AM
भारताने नाणेफेक जिंकले