IND vs NZ : शानदार फॉर्ममध्ये असणारा इशान किशन टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून OUT, कारण...

इशान किशन प्लेइंग इलेव्हनमधून आउट होण्यामागचं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 19:02 IST2026-01-28T18:59:09+5:302026-01-28T19:02:23+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs New Zealand 4th T20I IND Bowl First Ishan Kishan Out Due To Injury | IND vs NZ : शानदार फॉर्ममध्ये असणारा इशान किशन टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून OUT, कारण...

IND vs NZ : शानदार फॉर्ममध्ये असणारा इशान किशन टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून OUT, कारण...

भारत-न्यूझीलंड यांच्यातील चौथा टी-२० सामना विशाखापट्टणमच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून पुन्हा एकदा पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मालिका विजयानंतर भारतीय संघ एका बदलासह मैदानात उतरला आहे. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या इशान किशनच्या जागी अर्शदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. नाणेफेकीनंतर सूर्यकुमार यादवनं इशान किशनला संघाबाहेर ठेवण्यामागचं कारणही स्पष्ट केले आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

इशान किशन प्लेइंग इलेव्हनमधून आउट होण्यामागचं कारण काय?

इशान किशन याने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून धमाकेदार अंदाजात टीमइ इंडियात कमबॅक केले होते. पण तिसऱ्या सामन्यानंतर तो स्नायू दुखापतीमुळे त्रस्त होता. ही किरकोळ दुखापती पुढे डोकेदुखी ठरू नये, याच पार्श्वभूमीवर त्याला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाणेफेकीनंतर सूर्यकुमार यादवनं यासंदर्भातील माहिती दिली. एवढेच नाही तर अक्षर पटेलला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही वेळ लागणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.  

भारतीय संघाने मालिका जिंकली, आता व्हाइट वॉश देण्याची संधी

भारतीय संघाने पहिल्या तीन सामन्यातील विजयासह न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिका ३-० अशी आधीच आपल्या नावे केली आहे. उर्वरित दोन्ही सामने जिंकत टी-२० वर्ल्ड कप आधी टीम इंडिया पाहुण्या संघाला व्हाइट वॉश देत छोट्या प्रारुपात मोठा धमाका दाखवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ उरली सुरली लाज राखण्यासाठी जोर लावताना दिसेल. संजू सॅमसन पहिल्या तिन्ही सामन्यात अपयशी ठरला आहे. चौथ्या सामन्यात तरी तो लयीत दिसणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे असेल.

 

ICC Rankings Update : सूर्यासह रिंकू-हार्दिकची मुसंडी! अभिषेक शर्मा ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर

भारत  प्लेइंग इलेव्हन : 

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

न्यूझीलंड  प्लेइंग इलेव्हन :  

टिम सिफर्ट (यष्टीरक्,क), डेवॉन कॉन्वे, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर (कर्णधार), झकरी फॉल्केस, मॅट हेन्री, ईश सोधी, जेकब डफी.

Web Title: India vs New Zealand 4th T20I IND Bowl First Ishan Kishan Out Due To Injury