Big Breaking : नाणेफेकीपूर्वीच कर्णधाराची माघार, खांद्याला झाली गंभीर दुखापत

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला चौथा ट्वेंटी-20 सामना काही तासांत वेलिंग्टन येथे खेळवण्यात येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 11:41 AM2020-01-31T11:41:44+5:302020-01-31T11:45:02+5:30

whatsapp join usJoin us
India Vs New Zealand, 4th T20I : Captain Kane Williamson has been ruled out of tonight’s 4th T20I with a left-shoulder injury  | Big Breaking : नाणेफेकीपूर्वीच कर्णधाराची माघार, खांद्याला झाली गंभीर दुखापत

Big Breaking : नाणेफेकीपूर्वीच कर्णधाराची माघार, खांद्याला झाली गंभीर दुखापत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला चौथा ट्वेंटी-20 सामना काही तासांत वेलिंग्टन येथे खेळवण्यात येईल. टीम इंडियानं पहिले तीनही सामने जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे उर्वरीत दोन सामने हे टीम इंडियाला त्यांच्या बेंच स्ट्रेंथची चाचपणी करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. आतापर्यंत टीम इंडियानं फलंदाजी आणि गोलंदाजी या दोनही विभागात दमदार कामगिरी केलेली आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यात काही नव्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. पण, या सामन्याला सुरूवात होण्यापूर्वीच खांद्याच्या दुखापतीमुळे कर्णधारानं माघार घेतली आहे.

भारताने प्रयोग करण्याचे ठरविल्यास संजू सॅम्सन व रिषभ पंत यांना संधी मिळू शकते. पंतला अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे, पण त्याची निवड करताना कोणत्या फलंदाजाला वगळण्यात येईल आणि लोकेश राहुल यष्टिरक्षण करणार की नाही, याबाबत उत्सुकता राहील. आघाडीच्या तीन फलंदाजांमध्ये रोहित शर्मा, राहुल व कोहली यांचे स्थान पक्के असून श्रेयस अय्यर शानदार फॉर्मात आहे. मनीष पांडे आणि शिवम दुबे यांना अधिक संधी देणे आवश्यक आहे. त्याचवेळी, पुढील दोन सामन्यात रोहित किंवा कोहली यांना प्रत्येकी एका लढतीत विश्रांती मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

न्यूझीलंडच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल निश्चित आहे. कोलिन डी ग्रँडहोमला अंतिम दोन सामन्यांसाठी संघात स्थान मिळालेले नाही आणि त्याच्या स्थानी फलंदाज टॉम ब्रुसचा समावेश करण्यात आला आहे. यजमान संघ आपली फलंदाजीची बाजू मजबूत करू शकतो कारण आतापर्यंत त्यांच्या मधल्या फळीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.  

पण, या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनं माघार घेतली आहे. तिसऱ्या सामन्यात  क्षेत्ररक्षण करताना केनच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो आजचा सामना खेळणार नाही. 

Jasprit Bumrah: टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह 'हरवलाय'?

IND Vs NZ, 4th T20I: चौथ्या सामन्यावर पावसाचं सावट? भारताच्या विजयी मार्गात अडथळा?

या मालिकेतील केनची कामगिरी
तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात केन विलियम्सननं 95 धावांची खेळी करून टीम इंडियाच्या हातून सामना जवळपास हिसकावला होता. पण, मोहम्मद शमीच्या चतुर गोलंदाजीनं सामन्याला कलाटणी दिली. या मालिकेत केनचे हे दुसरे अर्धशतक ठरले. त्यानं पहिल्या सामन्यात 51 धावा केल्या होत्या. 

Web Title: India Vs New Zealand, 4th T20I : Captain Kane Williamson has been ruled out of tonight’s 4th T20I with a left-shoulder injury 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.