हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : महेंद्रसिंग धोनी कर्णधाराच्या भूमिकेत नसला तरी तो भारतीय संघाचा खरा आधारस्तंभ आहे. संघ संकटात असताना किंवा कर्णधाराला मदतीचा हात हवा असताना सर्वप्रथम धोनीच धावून जातो. संघातील प्रत्येक खेळाडूला धोनीचा सल्ला हवाहवासा वाटतो. म्हणूनच त्याचे संघात असणेच खेळाडूंमध्ये चैतन्य निर्माण करण्यासारखे असते. गोलंदाजांनाही त्याने केलेले मार्गदर्शन किती कामी येते, याची प्रचिती आली आहे. रविवारच्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही पुन्हा एकदा धोनीतील मार्गदर्शक पाहायला मिळाला. सामना सुरू होण्यापूर्वी धोनी युवा यष्टिरक्षक रिषभ पंतला मार्गदर्शन करत होता. त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.
तत्पूर्वी, या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच माजी कर्णधा धोनीनं विक्रमाला गवसणी घातली आणि हा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. धोनीचा हा 300 वा ट्वेंटी-20 सामना आहे आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे. आशियाई खेळाडूंमध्ये सर्वाधिक ट्वेंटी-20 सामन्यांचा विक्रम पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या नावावर आहे. त्याने 335 सामने खेळले आहेत त्यानंतर सोहेल तन्वीर ( 308) चा क्रमांक येतो.
पाहा व्हिडीओ...