हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा यष्टिमागून कमाल केली. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवून ऐतिहासिक मालिका जिंकण्याचा भारताचा निर्धार आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मात्र, न्यूझीलंडच्या टीम सेइफर्ट आणि कॉलीन मुन्रो यांनी जोरदार फटकेबाजी करताना रोहितचा निर्णय चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न केला. या जोडीने 7.4 षटकांत 80 धावांची सलामी दिली आणि त्यांची ही भागीदारी फिरकीपटु कुलदीप यादवने संपुष्टात आणली. पण, त्याला विकेट मिळवून देण्यात धोनीचा मोलाचा वाटा होता. धोनीने सेकंदाच्या 0.099 इतक्या जलद वेगाने ही स्टम्पिंग करून किवींना पहिला धक्का दिला.
कुलदीप यादवने या विकेटसह स्वतःच्या नावावर एक विक्रम नोंदवला. त्याने पदार्पणानंतर सर्वाधिक 18 विकेट्स या स्टम्पिंगमधून टिपल्या आणि त्यात सर्वात मोठा वाटा धोनीचा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) काही दिवसांपूर्वी धोनीच्या याच जलद स्पम्पिंगचे कौतुक केले होते. त्यांनी धोनी यष्टिमागे उभा असताना पुढे जाण्याचा शहाणपण करु नये असा सल्ला दिला होता. आज पुन्हा त्याची प्रचिती आली.
पाहा व्हिडीओ...