Join us  

India vs New Zealand 3rd T 20 : कॅप्टन कूल धोनीला सल्यूट; तिरंग्याचा राखला मान; पाहा व्हिडिओ 

भारताने नाणेफेक जिंकंत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सामन्याच्या 14 व्या षटकात मैदानात अचानक एक चाहता धोनीच्या दिशेने धावत आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 7:41 PM

Open in App

हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाला तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात पराभव पत्करावा लागला. २१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ २०८ धावांपर्यंत मजल मारू शकला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीला मोठी खेळी साकारता आली नसली तरी त्याने यष्टीमागे आपला दबदबा दाखवला. मात्र रविवारच्या सामन्यात धोनी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. त्याचे हे कृत्य पाहून त्याच्याप्रतिचा आदर अधिक वाढेल..

भारताने नाणेफेक जिंकंत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सामन्याच्या 14 व्या षटकात मैदानात अचानक एक चाहता धोनीच्या दिशेने धावत आला. चाहत्याच्या हातात भारताचा तिरंगा होता. हा चाहता धावत येत धोनीच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला. पण त्याच्या या कृत्यामुळे तिरंगा जमिनीवरलोळेल हे लक्षात येताच धोनीने तो चाहताच्या हातातून काढून घेतला.

पाहा व्हिडिओ

दरम्यान, भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी -20 मालिकेत 1-2 असा पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेल्या 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला 6 बाद 208 धावांपर्यंतच मजल मारता आली. या पराभवामुळे भारताची सलग 10 ट्वेंटी-20 मालिकेतील अपराजित मालिका खंडित झाली

 

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध न्यूझीलंड