New Zealand Daryl Mitchell Creates New Record vs Team India न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज डॅरिल मिचेल याने रविवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगमधील पॉवर दाखवली. सलामीवीर स्वस्तात माघारी फिरल्यावर डॅरिल मिचेल याने न्यूझीलंडच्या संघाचा डाव सावरला. या सामन्यात अर्धशतकाला गवसणी घालताच त्याने वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर या अर्धशतकाचे शतकात रुपातंर करत त्याने या मालिकेत सलग दुसरे शतक झळकावले. इथं जाणून घेऊयात न्यूझीलंडच्या बॅटरनं टीम इंडियाविरुद्ध केलेल्या खास विश्वविक्रमाबद्दल सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विक्रमी कामगिरीसह असा पराक्रम करणारा जगातील पहिला बॅटर ठरला डॅरिल मिचेल
सातत्यपूर्ण कामगिरीसह ICC च्या वनडे रँकिंगमध्ये किंग कोहलीला टक्कर देणाऱ्या डॅरिल मिचेल याने तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे मालिकेत आपल्या कामगिरीतील सातत्य कायम ठेवले. ३४ वर्षीय उजव्या हाताच्या न्यूझीलंड बॅटरचे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील सलग तिसरे आणि टीम इंडियाविरुद्धच्या वनडेतील सलग पाचवी ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी ठरली. भारतीय मैदानात टीम इंडियाविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो क्रिकेट जगतातील पहिला फलंदाज ठरला आहे. हा एक विश्व विक्रमच आहे.
किंग कोहली ‘ब्लॅक वॉटर’ पितो; टीम इंडियाचा प्रिन्स चक्क लाखोंचा वॉटर प्युरीफायर सोबत घेऊन फिरतो!
न्यूझीलंडकडून भारताविरुद्ध वनडेत सर्वाधिक सलग ५०+ धावा करणारे फलंदाज (न्यूझीलंड)
- ५ - केन विलियम्सन (२०१४)
- ५ - डॅरिल मिचेल (२०२५-२६)
- ३ - ग्लेन टर्नर (१९७५-७६)
- ३- स्टीफन फ्लेमिंग (१९९४-९५)
- ३- रॉजर ट्वोस (१९९९)
- ३ - रॉस टेलर (२०१९-२०)
भारतीय मैदानात टीम इंडियाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकवणारा ठरला दुसरा फलंदाज
इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना डॅरिल मिचेल याने कुलदीप यादव घेऊन आलेल्या २१ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर चौकार मारत अर्धशतक पूर्ण केले. या खेळीच शतकात रुपांतर करत त्याने सामना अविस्मरणीय केला. वनडे कारकिर्दीतील त्याने नववे शतक झळकावले. भारतीय मैदानात टीम इंडियाविरुद्ध ७ डावात (१३०, १३४, १७, ६३, ८४, १३१*, १००*) त्याच्या भात्यातून आलेली ही चौथी शतकी खेळी ठरली. भारतीय मैदानात सर्वाधिक शतके मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत एबी डिव्हिलियर्स अव्वलस्थानी आहे. त्याने ११ डावात ५ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.
Web Summary : Daryl Mitchell's consistent performance led him to achieve a unique record against India, becoming the first player to score five consecutive 50+ scores in ODIs. He also recorded his fourth century on Indian soil, solidifying his position as a key player against India.
Web Summary : डैरिल मिचेल के लगातार प्रदर्शन ने उन्हें भारत के खिलाफ एक अनोखा रिकॉर्ड हासिल करने के लिए प्रेरित किया, वनडे में लगातार पांच 50+ स्कोर बनाने वाले पहले खिलाड़ी बने। उन्होंने भारतीय धरती पर अपना चौथा शतक भी बनाया, जिससे भारत के खिलाफ एक प्रमुख खिलाड़ी के रूप में उनकी स्थिति मजबूत हुई।