Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NZ 3rd ODI : अर्शदीप सिंगचा भांगडा! हेन्री निकोल्सवर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की (VIDEO)

पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून देण्याची खासियत! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 14:39 IST

Open in App

India vs New Zealand, 3rd ODI : भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. शुभमन गिलनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात अखेर पहिल्या दोन सामन्यात बाकावर बसलेल्या अर्शदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. पहिल्याच षटकात त्याने सिंग इज किंग शो दाखवून देत न्यूझीलंडच्या सलामीवीराला खातेही न उघडता तंबूचा रस्ता दाखवला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पहिल्या षटकात विकेट मिळवून देण्याची खासियत! 

अर्शदीप सिंग याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये धमक दाखवली आहे. टी-२० मधील भारताचा नंबर वन असलेल्या या गोलंदाज पहिल्या षटकात विकेट मिळवून देण्यात माहिर आहे. पण वनडेत त्याच्यावर अजूनही संघ व्यवस्थापन भरवसा दाखवताना दिसत नाही. पण निर्णायक सामन्यात संधी मिळताच त्याने आपली खासियत दाखवून दिली. भारताच्या डावाची सुरुवात करताना पहिला चेंडू निर्धाव टाकल्यावर डेवॉन कॉन्वेनं दुसऱ्या चेंडूवर त्याला चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेत कॉन्वेनं हेन्री निकोल्सला स्ट्राइक दिले. अर्शदीनं त्याला खातेही न उघडता पहिल्याच चेंडूवर बोल्ड केले.  

India Squad vs Australia : एकाच वेळी टीम इंडियाचे दोन संघ जाहीर! या खेळाडूला ७ वर्षांनी कमबॅकची संधी

मग पिक्चरमध्ये आला हर्षित राणा

अर्शदीप सिंगनं पहिल्या षटकात पहिली विकेट मिळवून दिल्यावर हर्षित राणानं विकेटसह आपल्या स्पेलची सुरुवात केली. त्याने डेवॉन कॉन्वेला हिटमॅन रोहित शर्मा करवी झेलबाद केले. धावफलकावर अवघ्या ५ धावा लागल्या असताना न्यूझीलंडच्या संघाचे दोन्ही सलामीवीर माघारी फिरले. हर्षित राणाची तिसऱ्या सामन्यातील ही चौथी विकेट ठरली. हा सामना गाजवत त्याला वनडे मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल होण्याची संधी आहे. या यादीत न्यूझीलंडचा कायले जेमिसन ५ विकेट्ससह अव्वलस्थानी आहे.

भारतीय संघाने विजयी सलामी अन्  न्यूझीलंड संघाचा पलटवार

भारतीय संघाने वडोदराच्या बीसीएच्या मैदानात ४ विकेट्सनं सामना जिंकत या मालिकेत विजयी सलामी दिली होती. राजकोटच्या मैदानातील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने ७ विकेट्स राखून विजय नोंदवत मालिकेत १-१ असा बरोबरीचा डाव साधला. त्यामुळे तिसरा आणि अखेरचा वनडे सामना निर्णायक बनला आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात प्रसिद्ध कृष्णा मैदानात उतरला होता. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघात अर्शदीपला संधी मिळाली अन् त्याने संघाला दमदार सुरुवातही करुन दिल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडअर्शदीप सिंग