माऊंट मोनगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाने सोमवारी विजयाची हॅटट्रिक साजरी केली. गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यानंतर रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने सलग तिसऱ्या वन डे सामन्यात न्यूझीलंडला नमवले. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 2009नंतर भारतीय संघाने प्रथमच न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. याशिवाय कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. आजच्या निकालामुळे त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार सलीम मलिकच्या विक्रमाशी बरोबरी केली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs New Zealand 3rd ODI : 24 वर्षांत जे कुणालाच नाही जमलं, ते विराट कोहलीनं करून दाखवलं!
India vs New Zealand 3rd ODI : 24 वर्षांत जे कुणालाच नाही जमलं, ते विराट कोहलीनं करून दाखवलं!
India vs New Zealand 3rd ODI: भारतीय संघाने सोमवारी विजयाची हॅटट्रिक साजरी केली अन् विराट कोहलीने पराक्रम केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 14:52 IST
India vs New Zealand 3rd ODI : 24 वर्षांत जे कुणालाच नाही जमलं, ते विराट कोहलीनं करून दाखवलं!
ठळक मुद्देभारताची तिसऱ्या वन डे सामन्यात 7 विकेट राखून विजयन्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी