Join us

India vs New Zealand, 2nd Test : पृथ्वी शॉचे दमदार अर्धशतक; लंचपर्यंत भारत २ बाद ८५

खेळपट्टीवर गवत असल्यामुळे भारताची भंबेरी उडेल, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण पृथ्वीने भारताला चांगली सुरुवात करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 06:39 IST

Open in App

युवा सलामीवीर पृथ्वी शॉच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी लंचचपर्यंत २ बाद ८५ अशी मजल मारली होती.

न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यातही नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. खेळपट्टीवर गवत असल्यामुळे भारताची भंबेरी उडेल, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण पृथ्वीने भारताला चांगली सुरुवात करून दिली. यावेळी मयांकपेक्षा पृथ्वी जास्त आक्रमक खेळत होता.

मयांक हा सुरुवातीपासून चाचपडत खेळत होता. पण पृथ्वी हा आक्रमक फलंदाजी करत होता. पृथ्वीने यावेळी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याचबरोबर पृथ्वीच्या फटक्यांमध्ये यावेळी नजाकत दिसली. पृथ्वीच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे भारताला पहिल्या सत्रामध्ये सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. पण अर्धशतक झळकावल्यावर पृथ्वीला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. पृथ्वीने ६४ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५४ धावांची खेळी साकारली. लंच झाला तेव्हा भारताकडून चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली खेळत होते. 

टॅग्स :पृथ्वी शॉमयांक अग्रवालविराट कोहलीचेतेश्वर पुजारा