02:39 PM
लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा ( 8) पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर बाद झाला. टीम साऊदीनं त्याला रॉस टेलरकरवी झेलबाद केले. लोकेश राहुल व विराट कोहलीनं टीम इंडियाचा डाव सावरला, परंतु पॉवरप्लेच्या अखेरच्या षटकात टीम साऊदीनं आणखी एक धक्का दिला. त्यानं कोहलीला यष्टिरक्षक सेइफर्टकरवी झेलबाद केले. कोहली 11 धावाच करून माघारी परतला.
01:14 PM
11व्या षटकात रवींद्र जडेजानं किवींना धक्का दिला. कॉलीन डी ग्रँडहोमला त्यानं स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले.
12:57 PM
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला दुसरा ट्वेंटी-20 सामना आज ऑकलंड येथील इडन पार्कवर सुरू आहे. न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मार्टिन गुप्तील आणि कॉलीन मुन्रो यांनी न्यूझीलंडला दमदार सुरूवात करून दिली. या दोघांनी टीम इंडियाच्या शार्दूल ठाकूरला लक्ष्य करताना चौकार-षटकार खेचले, पण त्याच शार्दूलला यश मिळालं. सहाव्या षटकात शार्दूलनं किवीच्या गुप्तीलला बाद केले. विराट कोहलीनं मिडऑफला झेल टीपला. गुप्तील 20 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 33 धावांवर माघारी परतला.
12:01 PM
दोन्ही संघांत कोणतेही बदल नाही
न्यूझीलंड - मार्टीन गुप्तील, कॉलीन मुन्रो, केन विलियम्सन, कॉलीन डी ग्रँडहोम, रॉस टेलर, टीम सेईफर्ट, मिचेल सँटनर, टीम साऊदी, इश सोढी, बी टीकनर, एच बेन्नेट
भारत - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह