Join us  

IND Vs NZ, 2nd T20I : टीम इंडियात बदलाचे वारे, दुसऱ्या सामन्यात असे असतील अंतिम अकरा शिलेदार

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला दुसरा ट्वेंटी-20 सामना आज ऑकलंड येथील इडन पार्कवर खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 10:12 AM

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला दुसरा ट्वेंटी-20 सामना आज ऑकलंड येथील इडन पार्कवर खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियानं पहिला सामना जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियानं 6 विकेट राखून किवींनी ठेवलेलं 204 धावांचं लक्ष्य पार केले. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकी खेळीनं टीम इंडियाला विजय मिळवून दिला. पण, या सामन्यात जसप्रीत बुमराहला झालेला दुखापत आणि गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनं कर्णधार विराट कोहलीची डोकेदुखी वाढवली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात टीम इंडियात काही बदल पाहायला मिळतील.

टीम इंडियानं लोकेश राहुल ( 56), विराट कोहली ( 48) आणि श्रेयस अय्यर ( 58*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर 6 विकेट व 6 चेंडू राखून हा सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना  कर्णधार केन विलियम्सननं 26 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकारांसह 51, तर रॉस टेलरनं 27 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार खेचून नाबाद 54 धावा चोपल्या. या खेळींच्या जोरावर किवींनी 5 बाद 203 धावांचा डोंगर उभा केला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात दोन्ही संघांतील पाच फलंदाजांनी अर्धशतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. यासह टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांनी दोघांनी मिळून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. 

असे असले तरी गोलंदाजी विभागात टीम इंडिया थोडी अपयशी पडली. त्यामुळे आजच्या सामन्यात शार्दूल ठाकूरच्या जागी नवदीप सैनीला संधी मिळू शकते. शार्दूलनं पहिल्या सामन्यात 3 षटकांत 44 धावा दिल्या. सैनीनं श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करून दाखवली होती. त्यामुळे त्याला पहिल्या सामन्यात न खेळवल्यामुळे कोहलीवर टीका झाली होती. पण, आजच्या सामन्यात त्याचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे. 

आजच्या सामन्यातील संभाव्य भारतीय संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल ( यष्टिरक्षक), विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दुबे, शार्दूल ठाकूर/नवदीप सैनी, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा/वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.

खेळाडूंना मालामाल करणाऱ्या IPL मध्ये संघमालकांना 'केवढ्ढे' पैसे मिळतात माहित्येय?

टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजाची न्यूझीलंड दौऱ्यातून माघार!

IND Vs NZ : टीम इंडिया अन् न्यूझीलंड यांनी मिळून घडवला विश्वविक्रम, ट्वेंटी-20त प्रथमच घडला पराक्रम

IND vs NZ : जसप्रीत बुमराहला दुखापत, टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात बसू शकतो धक्का?

BCCIनं सेंट्रल काँट्रॅक्ट नाकारलं, पण उत्पन्नाची 'हे' सात स्रोत धोनीला करतात मालामाल

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडशार्दुल ठाकूरभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीरोहित शर्मालोकेश राहुलरवींद्र जडेजामोहम्मद शामीजसप्रित बुमराहकुलदीप यादवयुजवेंद्र चहल