Join us

India vs New Zealand 2nd T20 : रोहित शर्माचे अर्धशतकासह शतक पूर्ण, नेमकं घडलं काय...

पुढच्या सामन्यात रोहितला पुन्हा विश्वविक्रमाची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 14:23 IST

Open in App

ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताचा कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात रोहितने अर्धशतकी खेळी साकारली. या अर्धशतकासह त्याने शतक पूर्ण केल्याचेही समोर आहे.

रोहितने या सामन्यात 29 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 50 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या सामन्यात रोहितने आपल्या षटकारांचे शतक पूर्ण केले आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर 91 सामन्यांमध्ये 102 षटकार पूर्ण झाले आहेत.

पुढच्या सामन्यात रोहितला विश्वविक्रमाची पुन्हा संधीसध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रम ख्रिस गेल आणि मार्टीन गप्तील यांच्या नावावर आहे. या दोघांनी आतापर्यंत 103 षटकार लगावले आहेत. रोहितने पुढच्या सामन्यात दोन षटकाल लगावले तर आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रम त्याच्या नावावर होऊ शकतो.

या सामन्यातील रोहितचा विश्वविक्रम या अर्धशतकी खेळीसह आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये रोहितच्या सर्वाधिक धावा झाल्या आहेत. यापूर्वी हा विश्वविक्रम न्यूझीलंडच्या मार्टीन गप्तीलच्या नावावर होता. या सामन्यातील अर्धशतकासह रोहितच्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 सामन्यात 2288 धावा झाल्या आहेत. गप्तीलच्या नावावर यापूर्वी 2272 धावा होत्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आता रोहितच्या नावावर आहेत.

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध न्यूझीलंड