Join us

India vs New Zealand 2nd T20 Result : भारताचे आव्हान जीवंत, न्यूझीलंडवर सात विकेट्स राखून मात

भारताने रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर या न्यूझीलंडच्या आव्हानाचा सहज पाठलाग केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 14:52 IST

Open in App

ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : गोलंदाजांचा भेदक मारा आणि दमदार सलामीच्या जोरावर भारताने दुसरा ट्वेन्टी-20 सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 158 धावा केल्या होत्या. भारताने रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर या आव्हानाचा सहज पाठलाग केला.

 

भारताच्या कृणाल पंड्याने तीन विकेट्स मिळवत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले. कृणालला यावेळी अन्य गोलंदाजांनीही चागली साथ दिली. न्यूझीलंडकडून कॉलिन डी' ग्रँडहोमने अर्धशतकी खेळी साकारली.

न्यूझीलंडच्या 159 धावांचा पाठलाग करताना भाराताच्या सलामीवीरांनी दमदार फटकेबाजी केली. रोहितने यावेळी 29 चेंडूंत 3 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 50 धावांची खेळी साकारली. धवनने 30 धावा करत रोहितला चांगली साथ दिली.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्मा