IND vs NZ, 2nd ODI: रवींद्र जडेजा-नवदीप सैनीनं न्यूझीलंडला झुंजवलं, पण...

सलामीच्या आणि नवव्या जोडीनं केलेल्या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडला समाधानकारक पल्ला गाठून दिला. ईडन पार्कच्या मैदानाचा आकार पाहता टीम इंडियाचे ...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 07:20 AM2020-02-08T07:20:28+5:302020-02-08T16:01:36+5:30

whatsapp join usJoin us
India Vs New Zealand, 2nd ODI Live Score Updates, IND Vs NZ Highlights and Commentary in Marathi | IND vs NZ, 2nd ODI: रवींद्र जडेजा-नवदीप सैनीनं न्यूझीलंडला झुंजवलं, पण...

IND vs NZ, 2nd ODI: रवींद्र जडेजा-नवदीप सैनीनं न्यूझीलंडला झुंजवलं, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सलामीच्या आणि नवव्या जोडीनं केलेल्या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडला समाधानकारक पल्ला गाठून दिला. ईडन पार्कच्या मैदानाचा आकार पाहता टीम इंडियाचे धुरंधर सहज पार करतील, असा आत्मविश्वास सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता. पण, सामना सुरू झाला अन् अवघ्या 20 षटकातं चेहऱ्यावरील त्या आत्मविश्वासाचे निराशेत रुपांतर झाले. भारताचे आघाडीचे पाच फलंदाज 96 धावांवर माघारी परतले. श्रेयस अय्यर ( 52) आणि रवींद्र जडेजा यांनी आशेचा किरण जागवला. पण, तोही किवी गोलंदाजांच्या वेगवान वाऱ्यासमोर टिकू शकला नाही. मात्र, चमत्कार घडावा तसा नवदीप सैनी टीम इंडियासाठी धावून आला. जडेजा व नवदीप सैनीनं आठव्या विकेटसाठी दमदार भागीदारी करताना टीम इंडियाला अश्यक्यप्राय विजय मिळवून दिलाच होता. पण, किवींनी हा सामना जिंकून वन डे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.

03:49 PM

 लढलो, पण हरलो! जडेजा-सैनीच्या खेळीनं मात्र मनं जिंकली

03:48 PM

03:29 PM

जडेजानं सामन्याची सर्व सूत्र हाती घेताना अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं 67 चेंडूंत अर्धशतकी खेळी केली. समजुतदारीनं खेळून सामना तोंडाशी आणण्यात हातभार लावणाऱ्या युजवेंद्र चहलनं घाई केली. चहल 12 चेंडूंत 10 धावा करून माघारी परतला. 

03:25 PM

03:20 PM

03:19 PM

जडेजानं सामन्याची सर्व सूत्र हाती घेताना अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं 67 चेंडूंत अर्धशतकी खेळी केली. 

03:11 PM

जडेजा आणि नवदीप सैनी यांनी आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. या जोडीनं आठव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. कायले जेमीसननं ही जोडी संपुष्टात आणली. सैनीनं 49 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 45 धावा केल्या.

03:11 PM

02:54 PM

जडेजा आणि नवदीप सैनी यांनी आठव्या विकेटसाठी दमदार भागीदारी करताना संघाला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. 

02:02 PM

केदार जाधवला आज मोठी खेळी करून स्वतःचे स्थान आणखी पक्क करण्याची संधी होती. पण, त्यानंही निराश केले. तो अवघ्या 9 धावा करून माघारी परतला. श्रेयस अय्यरनं फॉर्म कायम राखताना अर्धशतकी खेळी केली. त्यानं 57 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 52 धावा केल्या. पण, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर चुकीचा फटक मारून तोही माघारी परतला. 

01:26 PM

भारताचे शतक फलकावर, श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा मैदानात

01:25 PM

भारताला पाचवा धक्का, केदाज जाधव नऊ धावांवर बाद

01:01 PM

12:56 PM

भारतीय संघानं पहिले चार फलंदाज 70 धावांच्या आत यापूर्वी कधी गमावले होते, ते माहित्येय.... इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत भारतावर ही नामुष्की ओढावली होती. 4 बाद 70 अशा अवस्थेतून नऊ पैकी दोनवेळाच भारताला विजय मिळवता आला आहे. 

12:52 PM

जसप्रीत बुमराहला नेमकं झालंय तरी काय? आजच्या सामन्यात नोंदवला नकोसा विक्रम

12:52 PM

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अंपायरवर भडकला, पण का?

12:50 PM

लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉनं दमदार सुरुवात केली, परंतु मयांक अग्रवाल पुन्हा अपयशी ठरला. हॅमिश बेन्नेटनं त्याला तिसऱ्या षटकात स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रॉस टेलरकरवी झेलबाद केले. मयांक 3 धावांवर माघारी परतला. या सामन्यातून आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कायले जेमिसन यानं भारताला दुसरा धक्का दिला. त्याच्या अप्रतिम चेंडूवर पृथ्वी शॉच्या यष्टिंचा वेध घेतला. भरताला 34 धावांवर दोन धक्के बसले. टीम साउदीनं त्याच्या भात्यातला आतापर्यंचा अप्रतिम चेंडू टाकून विराट कोहलीचाही त्रिफळा उडवला. भारताचे आघाडीचे तीनही फलंदाज 57 धावांत माघारी परतले. भारताची ही पडझड इथेच थांबली नाही. कॉलीन डी ग्रँडहोमच्या चेंडूवर कट शॉट मारण्याच्या नादात लोकेश राहुल त्रिफळाचीत झाला. 

12:11 PM

लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉनं दमदार सुरुवात केली, परंतु मयांक अग्रवाल पुन्हा अपयशी ठरला. हॅमिश बेन्नेटनं त्याला तिसऱ्या षटकात स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रॉस टेलरकरवी झेलबाद केले. मयांक 3 धावांवर माघारी परतला. या सामन्यातून आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कायले जेमिसन यानं भारताला दुसरा धक्का दिला. त्याच्या अप्रतिम चेंडूवर पृथ्वी शॉच्या यष्टिंचा वेध घेतला. भरताला 34 धावांवर दोन धक्के बसले. 

10:33 AM

पाहा सामन्याला कलाटणी देणारा क्षण

10:28 AM

10:17 AM

गुप्तीलनंतर किवी फलंदाजांनी तंबूत परतण्याचा सपाटा लावला. टॉम लॅथम आणि जिनी निशॅम हे लगेच माघारी परतले. त्यामुळे टीम इंडियानं सामन्यात पुनरागमन केले. जडेजानं क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा चपळता दाखवताना निशॅमला धावबाद केले. शार्दूलनं किवींना आखणी एक धक्का दिला. कॉलीन डी ग्रँडहोम स्वस्तात बाद झाला. मार्क चॅपमॅन (1)चा युजवेंद्र चहलनं स्वतःच्याच गोलंदाजीवर सुरेख झेल घेतला. चहलचा हा झेल पाहून कर्णधार कोहलीनंही आश्चर्य व्यक्त केलं. 1 बाद 142 वरून न्यूझीलंडची अवस्था 7 बाद 187 अशी दयनीय झाली. 

10:04 AM

गुप्तीलनंतर किवी फलंदाजांनी तंबूत परतण्याचा सपाटा लावला. टॉम लॅथम आणि जिनी निशॅम हे लगेच माघारी परतले. त्यामुळे टीम इंडियानं सामन्यात पुनरागमन केले. जडेजानं क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा चपळता दाखवताना निशॅमला धावबाद केले. 
 

09:56 AM

09:55 AM

09:37 AM

त्यानंतर खेळपट्टीवर दोन अनुभवी फलंदाज असल्यानं किवीं मोठा पल्ला गाठेल असे दिसत होते. पण, एक चोरटी धाव घेण्याच्या नादात सेट फलंदाज गुप्तील माघारी परतला. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर रॉस टेलरनं रिव्हर्स स्वीप खेळला, परंतु चेंडू शार्दूलच्या हाती पोहोचला. तोपर्यंत नॉन स्ट्रायकर एंडवरून गुप्तीलनं क्रिज सोडलं होतं. शार्दूलनं यष्टिरक्षक लोकेश राहुलकडे चेंडू फेकून गुप्तीलला धावबाद केले. गुप्तील 79 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकार खेचून 79 धावांवर बाद झाला. 

09:26 AM

गुप्तीलनं फॉर्म कायम राखताना आणखी एक अर्धशतकी खेळी केली. वन डे कारकिर्दीतील त्याचे हे 36वे अर्धशतक ठरले. त्याला टॉम ब्लंडलची साजेशी साथ मिळाली. या दोघांची 49 धावांची भागीदारी शार्दूल ठाकूरनं संपुष्टात आणली. नवदीप सैनीनं ब्लंडलचा ( 22)  अप्रतिम झेल टिपला. 

09:23 AM

08:56 AM

08:55 AM

मार्टीन गुप्तीलनं अर्धशतक पूर्ण केलं. वन डे क्रिकेटमधील त्याचे हे 36 वे अर्धशतक ठरले.

08:51 AM

Image

08:50 AM

विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. मार्टीन गुप्तील आणि हेन्री निकोल्स यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. 17 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर युजवेंद्र चहलनं ही भागीदारी संपुष्टात आणली. निकोल्स 41 धावा करून पायचीत झाला. 

07:42 AM

NZ vs IND, 2nd ODI : शार्दूल ठाकूर नव्हे, तर कोहलीनं दुसऱ्या वन डेत प्रमुख गोलंदाजाला बसवलं

07:38 AM

यजमान संघाला रोखण्याचे अवघड काम विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला करावे लागणार आहे.

07:33 AM

भारतीय संघातील खेळाडू

विराट कोहली (कर्णधार), पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, केएल राहुल,  केदार जाधव, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी.


 

07:26 AM

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

07:23 AM

भारतापुढे न्यूझीलंडला रोखण्याचे अवघड आव्हान

07:22 AM

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना आज


 

Web Title: India Vs New Zealand, 2nd ODI Live Score Updates, IND Vs NZ Highlights and Commentary in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.