Join us

India vs New Zealand 2nd ODI: कुलदीप यादवची दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेच्या 'जम्बो' विक्रमाशी बरोबरी

India vs New Zealand 2nd ODI: फिरकीपटू कुलदीप यादवनेही या विजयात मोठा वाटा उचलला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 15:46 IST

Open in App
ठळक मुद्देफिरकीपटू कुलदीप यादवनेही या विजयात मोठा वाटा उचलला.भारताची मालिकेत 2-0 ने आघाडी

माऊंट माऊंगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताने दुसऱ्या वन डे सामन्यात न्यूझीलंडवर 90 धावांनी विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. रोहित शर्माला ( 87) सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. मात्र, फिरकीपटू कुलदीप यादवनेही या विजयात मोठा वाटा उचलला. त्याने न्यूझीलंडच्या चार फलंदाजांना 45 धावा देत माघारी पाठवले. कुलदीपने या कामगिरीसह भारताचा माजी कर्णधार व दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेच्या विक्रमाशी केली बरोबरी. भारताच्या 324 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांची तारांबळ उडाली. डॉज ब्रेसवेल ( 57), टॉम लॅथम ( 34) व कॉलीन मुन्रो ( 31) यांनी न्यूझीलंडकडून चांगली खेळी केली, परंतु त्यांना 234 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने हा सामना 90 धावांनी जिंकला. कुलदीपने सलग दुसऱ्या वन डे सामन्यात चार विकेट घेण्याचा पराक्रमही केला. कुलदीपने पहिल्या वन डे सामन्यात 39 धावांत 4 विकेट घेतल्या होत्या. न्यूझीलंडमध्ये सलग दोन वन डे सामन्यात चार विकेट घेणारा पहिला भारतीय फिरकीपटू ठरला. 

भारतीय फिरकीपटूंनी या वन डे मालिकेत आतापर्यंत 13 विकेट घेतल्या आहेत. 1994 आणि 2009 मध्ये भारतीय फिरकीपटूंनी न्यूझीलंड दौऱ्यात 12 विकेट्स घेतल्या होत्या. तोही विक्रम या मालिकेत मोडला गेला.  वन डे सामन्यात सर्वाधिक चार विकेट घेण्याचा विक्रम कुंबळेच्या नावावर आहे. त्याने 269 सामन्यांत 10 वेळा चार विकेट घेतल्या आहेत. त्यापाठोपाठ रवींद्र जडेजा 8 ( 147 सामने), सचिन तेंडुलकर 6 ( 463), हरभजन सिंग 5 ( 234) आणि कुलदीप यादव 5 (37) यांचा क्रमांक येतो. 

न्यूझीलंडमध्ये दोन वेळा चार विकेट घेणारा कुलदीप हा भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने कुंबळे व जवागल श्रीनाथ यांच्या विक्रमाची बरोबरी केली. आशियाई खंडाबाहेर चार विकेट घेण्याचा मान कुलदीपने पाचव्यांदा पटकावला. या कामगिरीसह त्याने कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी केली.   

टॅग्स :कुलदीप यादवभारत विरुद्ध न्यूझीलंडअनिल कुंबळे