माऊंट माऊंगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाने शनिवारी दुसऱ्या वन डे सामन्यातही न्यूझीलंडला नमवले. भारताच्या 324 धावांचा पाठलाग करताना किवी संघ 234 धावांपर्यंत मजल मारू शकला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे. पुन्हा एकदा कुलदीपने ( 4 विकेट) किवी फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. डॉज ब्रेसवेलची 57 धावांची झुंज अपयशी ठरली. प्रजासत्ताक दिनी भारताला प्रथमच विजय मिळवता आला. याआधी प्रजासत्ताक दिनी झालेल्या तीन सामन्यात भारताला विजय मिळवता आला नव्हता. 87 धावांची खेळी करणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs New Zealand 2nd ODI: अखेर भारताने प्रजासत्ताक दिनी विजयाचा तिरंगा फडकावला
India vs New Zealand 2nd ODI: अखेर भारताने प्रजासत्ताक दिनी विजयाचा तिरंगा फडकावला
India vs New Zealand 2nd ODI: भारतीय संघाने शनिवारी दुसऱ्या वन डे सामन्यातही न्यूझीलंडला नमवले. रोहित शर्माला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 15:06 IST
India vs New Zealand 2nd ODI: अखेर भारताने प्रजासत्ताक दिनी विजयाचा तिरंगा फडकावला
ठळक मुद्देभारतीय संघाने शनिवारी दुसऱ्या वन डे सामन्यातही न्यूझीलंडला नमवले. रोहित शर्माला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.न्यूझीलंडमध्ये धावांच्या फरकाने भारताचा सर्वात मोठा विजय