ठळक मुद्देन्यूझीलंडचा संपूर्ण संघ 157 धावांवर तंबूतकुलदीप यादवच्या सर्वाधिक 4 विकेट्समोहम्मद शमीच्या तीन व युजवेंद्र चहलच्या दोन विकेट
नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय गोलंदाजांनी कामगिरी चोख बजावताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 157 धावांवर माघारी पाठवला. पहिल्या वन डे सामन्यात भारताला विजयासाठी अवघ्या 158 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यात कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद शमी 3 आणि युजवेंद्र चहलने 2 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. या गोलंदाजांव्यतिरिक्त माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची यष्टिमागची कामगिरी उल्लेखलनीय ठरली. त्याने केलेल्या सुचनेनुसार गोलंदाजांनी चेंडू टाकले आणि यश मिळवले.
सामन्यात कर्णधार विराट कोहली असला तरी धोनीचा सल्ला घेणे तो पसंत करतो. गोलंदाजही धोनीच्या सल्लानुसार गोलंदाजी करतात आणि त्यातून मिळणारे यश हे भारताच्या फायद्याचे ठरले. धोनीने या सामन्यात ल्युक फर्ग्युसनला यष्टिचीत केले.
पण, धोनी यष्टिमागून देत असलेले सल्ले गोलंदाजानी ऐकले. याची प्रचिती अखेरच्या विकेटसाठी आली. यष्टिमागून धोनीने कुलदीपला एक सल्ला दिला. तो म्हणाला,'' हा ( ट्रेंट बोल्ट) डोळे बंद करून खेळेल तू याला दुसरा टाक ( ये आंख बंद करके खेलेगा, दुसरा वाला डाल सकता है इसको.)'' कुलदीपने ते ऐकले आणि पुढच्याच चेंडूवर बोल्ट स्लीपमध्ये रोहित शर्माच्या हातात झेल देऊन माघारी फिरला.