Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान

या धावांचा पाठलाग करताना आता हिटमॅन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या फलंदाजीवर सर्वांच्या नजरा असतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 17:38 IST

Open in App

India vs New Zealand 1st ODI : वडोदराच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या वनडे सामन्यात पाहुण्या न्यूझीलंड संघाने भारतीय संघासमोर ३०१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. शुभमन गिलनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर डेवॉन कॉन्वे आणि हेन्री निकोल्स या सलामी जोडीनं शतकी भागीदारीसह संघाला चांगली सुरुवात करून दिली. हर्षित राणाने या दोघांना तंबूचा रस्ता दाखवल्यावर न्यूझीलंडचा संघ अडचणीत सापडला होता. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी न्यूझीलंडच्या संघाला ठराविक अंतराने धक्क्यावर धक्का दिला. पण डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) याने आपल्या फलंदाजीतील धमक दाखवत संघाचा डाव सावरला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

डॅरिल मिचेलची बॅट तळपली; आता रोहित-विराटच्या बॅटिंगवर असतील नजरा

ICC वनडे क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेल याने ७१ चेंडूत केलेल्या ८४ धावांची खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने धावफलकावर ३०० धावा लावल्या आहेत. या धावांचा पाठलाग करताना आता ICC नंबर वन आणि नंबर २ बॅटर अर्थात हिटमॅन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या फलंदाजीवर सर्वांच्या नजरा असतील.

IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी

न्यूझीलंडच्या सलामीवीरांची विक्रमी भागीदारी

भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी संयमी खेळी करत भारतीय गोलंदाजांचे खांदे पाडले. डेवॉन कॉन्वेनं ६७ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. याशिवाय हेन्री निकोल्सनं ६९ चेंडूत ६२ धावांचे योगदान दिले. या जोडीनं शतकी भागीदारीसह खास विक्रम रचला. २७ वर्षांनी भारतीय मैदानात न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी रचल्याचे पाहायला मिळाले. या दोघांशिवाय डॅरिल मिचेल (Daryl Mitchell)  याने न्यूझीलंडच्या संघाकडून सर्वोच्च ८४ धावांची खेळी साकारली. तळाच्या फलंदाजीत पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या क्रिस्टियन क्लार्कनं १७ चेंडूत नाबाद २४ धावांची खेळी करत संघाच्या धावफलकावर ३०० धावा लावल्या.

भारतीय जलदगती गोलंदाजांना जलवा! जड्डूसह वॉशिंग्टन सुंदरची पाटी कोरी

गोलंदाजीत भारतीय संघाकडून हर्षित राणा, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा या जलदगती गोलंदाजांनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. याशिवाय कुलदीप यादवनं एक विकेट घेतली. रवींद्र जडेजासह वॉशिंग्टन सुंदरची पाटी मात्र कोरीच राहिली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही जड्डूला एकही विकेट मिळाली नव्हती.

English
हिंदी सारांश
Web Title : New Zealand sets 301-run target for India in first ODI.

Web Summary : New Zealand scored 300 against India in the first ODI, powered by Mitchell's 84. Indian openers need a strong start to chase the target.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौरान्यूझीलंडभारत विरुद्ध न्यूझीलंडशुभमन गिलरोहित शर्माविराट कोहली