India vs New Zealand 1st ODI : ... आणि विजयानंतर कोहलीने केला धर्मेंद्र स्टाईल डान्स, पाहा व्हिडीओ

सामना संपल्यावर एका 'सेगवे' या दुचाकीवर उभा राहीला होता. या दुचाकीवरून त्याने मैदानात फेरफटकाही मारला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 15:01 IST2019-01-23T15:00:11+5:302019-01-23T15:01:36+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs New Zealand 1st ODI: ... and Kohli Done Dharmendra style dance after winning match | India vs New Zealand 1st ODI : ... आणि विजयानंतर कोहलीने केला धर्मेंद्र स्टाईल डान्स, पाहा व्हिडीओ

India vs New Zealand 1st ODI : ... आणि विजयानंतर कोहलीने केला धर्मेंद्र स्टाईल डान्स, पाहा व्हिडीओ

नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्यात विजयी श्रीगणेशा केला. विजयानंतर भारतीय संघ रीलॅक्स वाटत होता. सामना संपल्यावर भारतीय संघ मैदानात मजा मस्करी करत होता. यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीने चक्क बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते धमेंद्र यांच्या खास स्टाईलमध्ये डान्स केल्याचे पाहायला मिळाले.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने यजमान न्यूझीलंडवर आठ गडी राखून मात केली. गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यानंतर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीने दमदार फलंदाजी करत भारताचा विजय निश्चित केला. या विजयासह भारतीय संघाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.

सामना संपल्यावर एका 'सेगवे' या दुचाकीवर उभा राहीला होता. या दुचाकीवरून त्याने मैदानात फेरफटकाही मारला. त्यानंतर कोहलीने चक्क धमेंद्र यांच्या खास स्टाईलमध्ये एक हात डोक्यावर आणि दुसरा हात कंबरेवर ठेवून डान्सही केला.

हा पाहा डान्सचा खास व्हिडीओ




 

 

Web Title: India vs New Zealand 1st ODI: ... and Kohli Done Dharmendra style dance after winning match