Join us  

India vs Ireland 1st T20I: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाचा शुभारंभ होण्याआधीच आली टेंशन वाढवणारी बातमी; पहिल्या सामन्यावर संकट?

India vs Ireland 1st T20I: आयर्लंडविरुद्धच्या दोन  ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत हार्दिकच्या खांद्यावर टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 7:38 PM

Open in App

India vs Ireland 1st T20I: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली ( Hardik Pandya) गुजरात टायटन्सने पहिल्याच प्रयत्नात आयपीएल २०२२ जेतेपद पटकावून करिष्मा केला. युएईत झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर हार्दिकने खेळलेली ही पहिलीच स्पर्धा होती आणि त्यातही त्याने नेतृत्व कौशल्य दाखवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आता तर आयर्लंडविरुद्धच्या दोन  ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत हार्दिकच्या खांद्यावर टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आज आयर्लंड-भारत हा पहिला ट्वेंटी-२० सामना होणार आहे आणि हार्दिकही विजयी प्रारंभासाठी सज्ज आहे. पण, एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. आयर्लंड-भारत यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याआधी मायदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेचा निकाल पावसामुळे २-२ असा बरोबरीत लागला आहे.  weather.comच्या माहितीनुसार रविवारी दुपारी पाऊस पडण्याची शक्यता ही ७० टक्के वर्तवण्यात आली होती. तेथील स्थानिक वेळेनुसार ही लढत ४ वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे  weather.comच्या रिपोर्टनुसार पहिल्या सामन्यासाठी चांगली गोष्ट नाही. जस जसा दिवस पुढे जाईल, तसा पावसाचा जोरही वाढेल, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे सामन्याला सुरुवातच उशीरा होण्याची शक्यता आहे.  

भारतीय संघ २०१८मध्ये येथे आला होता आणि तेव्हा मालिका २-० अशी जिंकली होती.    

भारतीय संघ - हार्दिक पांड्या ( कर्णधार), भुवनेश्वर कुमार( उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सुर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्षदीप सिंग, उमरान मलिक. 

टॅग्स :भारतआयर्लंडहार्दिक पांड्या
Open in App