Join us  

India vs Ireland 1st T20I: भुवनेश्वर कुमारची विक्रमी कामगिरी, हार्दिक पांड्याने रचला इतिहास; ८ चेंडूंत दोन्ही सलामीवीर माघारी

India vs Ireland 1st T20I : नाणेफेक होऊन जवळपास तीन तास उलटूनही भारत-आयर्लंड सामना सुरू झाला नव्हता. ९ वाजता पहिला चेंडू फेकला जाणारा चेंडू पावसामुळे ११.२० वाजता फेकला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 11:39 PM

Open in App

India vs Ireland 1st T20I : विलंबाने सुरू झालेल्या सामन्यात भारतीय चाहत्यांचा उत्साह मात्र कमी केला नाही. ११.२० मिनिटांनी सुरू झालेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पहिल्या ८ चेंडूंत आयर्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar ) व कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यांनी हे धक्के देताना विक्रमाची नोंद केली.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पुन्हा पावसामुळे तीन तासांचा खेळ वाया गेला. पावसामुळे बराच वेळ वाया गेला आणि ही लढत १२-१२ षटकांची खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार १ ते ४ षटकं पॉवर प्ले राहणार आहे. तीन गोलंदाजांना प्रत्येकी दोन, तर दोन गोलंदाजांना प्रत्येकी ३ षटकं फेकता येणार आहेत. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात कमाल दाखवली. त्याने पाचव्या चेंडूवर अँडी बालबर्नीचा ( ०) त्रिफळा उडवला.  ६व्या चेंडूवर गॅरेथ डेलनीच्या LBW साठी जोरदार अपील झाले अन् DRS ही घेतला गेला, परंतु तो वाया गेला. दुसऱ्या षटकात हार्दिक पांड्याने टाकलेला पहिला चेंडू पॉल स्टर्लिंगने कव्हरच्या दिशेने सीमापार पाठवला. पुढचा चेंडूवर त्याने उत्तुंग फटका मारला, परंतु दीपक हुडाने अलगद झेल घेतला.   आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक ३४ विकेट्स घेण्याच विक्रम भुवीच्या नावे नोंदवला गेला आहे. सॅम्युएल बद्री ( ३३) व टीम साऊदी ( ३३) यांचा विक्रम भुवीने मोडला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त गोलंदाजी करणारा आणि विकेट मिळवणारा हार्दिक पांड्या हा भारताचा पहिलाच कर्णधार ठरला. 

टॅग्स :भारतआयर्लंडभुवनेश्वर कुमारहार्दिक पांड्या
Open in App