Join us

India vs England: अश्विनच्या शतकी खेळीवर वीरेंद्र सेहवागचं धमाल ट्विट, इंग्लंडची घेतली 'फिरकी'

Virendra Sehwag Tweet, India vs England, Chennai Test:  भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यानं टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 19:50 IST

Open in App

India vs England, 2nd Test Chennai: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा फिरकीपटू आर.अश्विन (R Ashwin) यानं दमदार शतकी खेळी साकारल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चेन्नईची खेळपट्टी वाईट असल्याची टीका केली जात असताना अश्विननं खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी केली यावरुन भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यानं टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

वीरेंद्र सेहवागनं हॉलीवूडच्या Thor या चित्रपटातील एक पोस्टर शेअर केलंय. यात आर.अश्विन सुपरपावर Hela च्या रुपात दाखवण्यात आलं आहे. Thor ने केलेल्या हल्ल्याला अश्विन इथं थोपवताना दिसतोय. इंग्लंडच्या माऱ्याला अश्विननं ज्यापद्धतीनं आज प्रत्युत्तर दिलं ते सेहवागनं ट्विटमधून दाखवलं आहे. त्यास जशासतसं कॅप्शनही सेहवागनं दिलंय. 

सेहवागच्या हटके ट्विटची नेहमीच चर्चा होत असते. कल्पक आणि विनोदी पद्धतीनं सेहवाग क्रिकेटमधील प्रसंगांवर भाष्य करत असतो. सेहवागनं अश्विनबाबतच्या केलेल्या ट्विटलाही तुफान प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत ३७ हजारांहून अधिक लोकांना सेहवागचं ट्विट लाइक केलंय. तर ४ हजार लोकांनी रिट्विट केलं आहे.  

टॅग्स :विरेंद्र सेहवागभारत विरुद्ध इंग्लंडबीसीसीआयआर अश्विन