Join us

India vs England: कोहली आणि रुट सध्याचे सर्वोत्तम फलंदाज; ब्रायन लाराची स्तुतीसुमने

आतापर्यंत इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांमध्ये कोहलीने ५४४ धावा केल्या आहेत, यामध्ये दोन शतकांसह तीन अर्धशतकांचा समावेश आहे. पण कोहलीच्या एवढ्या धावांनंतरही भारताने ही मालिका १-३ अशी गमावली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 19:38 IST

Open in App
ठळक मुद्देक्रिकेट जगतात सध्याच्या घडीला इंग्लंडचा जेम्स अँडरसन आणि दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा हे सर्वोत्तम गोलंदाज आहेत, असे मतही लाराने व्यक्त केले आहे.

लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : विराट कोहली आणि जो रुट हे सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम फलंदाज आहेत, असे मत वेस्ट इंडिजचा माजी महान ब्रायन लारा याने व्यक्त केले आहे. सध्या २०१९च्या विश्वचषकाची एक टूर सुरु आहे. लारा या टूरचा एक भाग आहे. या टूरदरम्यान एका कार्यक्रमामध्ये लाराने हे वक्तव्य केले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोहलीने दमदार फलंदाजी केली आहे. आतापर्यंत इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांमध्ये कोहलीने ५४४ धावा केल्या आहेत, यामध्ये दोन शतकांसह तीन अर्धशतकांचा समावेश आहे. पण कोहलीच्या एवढ्या धावांनंतरही भारताने ही मालिका १-३ अशी गमावली आहे.

क्रिकेट जगतात सध्याच्या घडीला इंग्लंडचा जेम्स अँडरसन आणि दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा हे सर्वोत्तम गोलंदाज आहेत, असे मतही लाराने व्यक्त केले आहे. या टूरच्या कार्यक्रमादरम्यान लारावर प्रश्नांचा भडीमार केला होता. पण लारानेही हे सर्व प्रश्न चांगलेच टोलवले होते.

याबाबत लारा म्हणाला की, " सध्याच्या क्रिकेट जगतात अँडरसन आणि रबाडा हे दोघे भेदर मारा करत आहेत. पण जेव्हा मी खेळत होतो तेव्हा मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न हे दोन्ही महान फिरकीपटू होते. खेळपट्टीवर स्थिरस्थावर झाल्यावरही हे दोघे फलंदाजाला बुचकळ्यात पाडायचे. त्यामुळे या दोघांचा सामना करताना सतर्क रहावे लागायचे. " 

टॅग्स :विराट कोहलीजो रूटभारत विरुद्ध इंग्लंड