Join us

India vs England Test: इशांतला बर्थडे विश करुन फसला; नेटिझन्सकडून शिखर धवन ट्रोल

India vs England Test: भारताचा सलामीवीर शिखर धवन इंग्लंड दौऱ्यावर त्याच्या कामगिरीपेक्षा सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलमुळे अधिक चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 09:35 IST

Open in App

भारत वि. इंग्लंड कसोटीः भारताचा सलामीवीर शिखर धवन इंग्लंड दौऱ्यावर त्याच्या कामगिरीपेक्षा सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलमुळे अधिक चर्चेत आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत धवनला सहा डावांत केवळ 158 धाव करता आल्या आहेत आणि सलामीचे अपयश हा भारतासाठी डोकेदुखीचा विषय ठरलेला आहे. त्यात धवनने चौथ्या कसोटीतील पराभवानंतर केलेले ट्विट त्याला महागात पडले. धवनने सहकारी इशांत शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याबरोबरच सल्ला दिला. त्यानंतर नेटिझन्सनी त्याला धारेवर धरले.इंग्लंडचे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. चौथ्या कसोटीत भारताला विजयासाठी 245 धावांचे लक्ष्यही पेलता आले नाही. भारताचा संपूर्ण संघ 184 धावांवर माघारी परतला आणि इंग्लंडने हा सामना 60 धावांनी जिंकून मालिका खिशात घातली. सामना संपल्यानंतर धवनने इशांतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर नेटिझन्सच्या रोषाचा त्याला सामना करावा लागला. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडशिखर धवनइशांत शर्माक्रिकेट