Join us
Daily Top 2Weekly Top 5

India vs England Test: बुमरा दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता

India vs England Test : लॉर्ड्स येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याला बुमरा मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 16:25 IST

Open in App
ठळक मुद्देबुमरा त्याच्या हाताला झालेल्या दुखापतीमधून अजून सावरू शकलेला नाही.

लंडन : भारताचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा दुखापतीमधून सावरलेला नाही. त्यामुळे लॉर्ड्स येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याला बुमरा मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारताने इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी संघाची निवड केली आहे. या संघात बुमराला जायबंदी असूनही स्थान देण्यात आले आहे. पण बुमरा त्याच्या हाताला झालेल्या दुखापतीमधून अजून सावरू शकलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराला खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात इशांत शर्माने दमदार कामगिरी केली होती. पण उमेश यादवला मात्र छाप पाडता आली नव्हती. त्यामुळे उमेशच्या जागी बुमराला स्थान देण्याचा विचार संघ व्यवस्थापन करत होता. पण बुमरा दुखापतीतून सावरला नसल्यामुळे त्याला आता दुसऱ्या सामन्यात संधी देता येणार नाही.

टॅग्स :जसप्रित बुमराहभारत विरुद्ध इंग्लंडइशांत शर्मा