Join us
Daily Top 2Weekly Top 5

India vs England Test: जस्प्रीत बुमराचा तो इशारा कोणाला? पाहा व्हिडीओ

India vs England Test: भारतीय क्रिकेट संघाने ट्रेंट ब्रिज कसोटीत विजय मिळवून इंग्लंडविरूद्धच्या मालिकेतील आव्हान कायम राखले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 09:16 IST

Open in App

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाने ट्रेंट ब्रिज कसोटीत विजय मिळवून इंग्लंडविरूद्धच्या मालिकेतील आव्हान कायम राखले. जलदगती गोलंदाजाच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने २०३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. इशांत शर्माने इंग्लंडच्या सलामीच्या जोडीला माघारी धाडल्यानंतर जस्प्रीत बुमराने पाच विकेट घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

बुमराच्या कामगिरीपेक्षा त्याच्या आनंद साजऱ्या करण्याच्या शैलीने सर्वांचे लक्ष अधिक वेधले. स्टुअर्ट ब्रॉडला बाद करून बुमराने पाच विकेट पूर्ण केल्या. त्याने जो रुट, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, ख्रिस वोक्स आणि ब्रॉड यांना बाद केले. दुसऱ्या डावात त्याने २९ षटकांत ८५ धावांत पाच विकेट घेतल्या. त्यानंतर बुमराने कर्णधार विराट कोहलीप्रमाणे हातवारे करून आपला आनंद साजरा केला. विराटने शतकानंतरही असाच आनंद साजरा केला होता. त्याने ओठांवर बोट ठेवून टीकाकारांना गप्प बसण्याचा इशारा केला होता. बुमरानेही काहीसे असेच केले. भारताला पाचव्या दिवशी विजयासाठी केवळ एका विकेटची आवश्यकता होती आणि त्यांना फार काळ प्रतीक्षा करावी लागली नाही. आर. अश्विनने आदिल रशीदला बाद करून भारताचा एतिहासिक विजय निश्चित केला. भारताने या विजयासह मालिकेतील आव्हान १-२ असे जीवंत ठेवले आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजसप्रित बुमराहक्रिकेटक्रीडा