साऊदम्टन: भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेत यजमानांनी ३-१ अशी बाजी मारली आहे. तिसऱ्या कसोटीतील विजयानंतर भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करेल असे वाटले होते. तशी संधीही त्यांना होती, परंतु फलंदाजांनी नांगी टाकली आणि भारताला पराभवासह मालिकाही गमवावी लागली. मात्र या मालिकेत कर्णधार विराट कोहलीची वैयक्तीक कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. मालिकेत सर्वाधिक ५४४ धावा त्याच्या नावे आहेत. मात्र मंगळवारी नेटिझन्सनी त्याची टिंगल उडवली.
साऊदम्टन कसोटी पराभवानंतर भारतीय संघाने पुन्हा एकदा पर्यटन केले. विराट आणि भारतीय संघातील काही सदस्य मंगळवारी इंग्लिश प्रीमियर लीगमधील क्लब साऊदम्टन एफसीच्या भेटीला गेले. इपीएलमधील या क्लबने विराटसोबतचा फोटोही त्यांच्या ट्विटर हँडलवर ट्विट केला. क्लबचा आक्रमणपटू डॅनी इंग्ससोबत असलेला विराटचा फोटो चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर विराटची टिंगल उडवणारे मॅसेज फिरू लागले. काहींनी तर त्याला क्लब जॉइंट करतोस का असे विचारले.
![]()
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा व अखेरचा सामना शुक्रवारपासून सुरू होत आहे.