ठळक मुद्देरशिदने एका सामन्यात ज्यापद्धतीने कोहलीला क्लीन बोल्ड केले होते
लंडन : इंग्लंडच्या रडारवर सध्या आहे तो भारताचा कर्णधार विराट कोहली. त्यामुळे कोहलीवर जेवढं दडपण वाढवता येईल, तेवढा प्रयत्न इंग्लंडचा संघ करत आहे. त्यामुळे 1 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात फिरकीपटू आदिल रशिदला खेळवण्याती दाट शक्यता असल्याचे दिसत आहे.
एका प्रसारमाध्यमाच्या समूहाने इंग्लंडचा कर्णधार जो रूट याची सामन्याच्या पूर्वसंध्येला विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये कोणते अकरा खेळाडू पहिल्या कसोटीमध्ये खेळतील, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी रूटने, " पहिल्या सामन्यात आम्ही मोईल अली आणि जॅमी पोर्टर यांना आम्ही खेळवणार नाही. " असे म्हटले होते. या त्याच्या वक्तव्यानुसार संघात आदिल रशिद हा एकमेव फिरकीपटू असेल, असा होतो. कोहलीवर दडपण आणण्यासाठी इंग्लंडची ही एक नवीन चाल असल्याचे म्हटले जात आहे.
कोहलीवर का येणार दडपण?
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहलीला एकही शतक झळकावता आले नाही, याचे मुख्य कारण रशिदचा भेदक मारा असल्याचे म्हटले जात आहे. रशिदने एका सामन्यात ज्यापद्धतीने कोहलीला क्लीन बोल्ड केले होते, ते पाहता कोहली रशिदची गोलंदाजी समजू शकलेला नाही, असे इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनाला वाटत आहे. त्यामुळेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेल्या रशिदला इंग्लंडच्या संघात स्थान देण्यात आले आहे.