Join us

India vs England Test: भारतीय संघासाठी खूष खबर, बेन स्टोक्स दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता

इंग्लंडसाठी स्टोक्स हा महत्त्वाचा खेळाडू आहे. सध्या तो चांगल्या फॉर्मातही आहे. त्यामुळे तो जर संघात नसेल तर स्टोक्सची उणीव त्यांना वाटणार हे निश्चित.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 17:47 IST

Open in App
ठळक मुद्देजर स्टोक्स या प्रकरणात दोषी आढळला तर त्याला दुसऱ्या सामन्यात खेळता येणार नाही.

लंडन : पहिला कसोटी सामना भारताने गमावला असला तरी त्यांच्यासाठी एक खूष खबर आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात ज्या बेन स्टोक्सने भारताचा कर्णधार विराट कोहलीला बाद करून सामना फिरवला तो दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इंग्लंडकडे स्टोक्सच्या रुपात एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. स्टोक्सनेही बऱ्याचदा संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका वठवली आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी स्टोक्स हा महत्त्वाचा खेळाडू आहे. सध्या तो चांगल्या फॉर्मातही आहे. त्यामुळे तो जर संघात नसेल तर स्टोक्सची उणीव त्यांना वाटणार हे निश्चित.

स्टोक्स सामन्याला का मुकणारगेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये ब्रिस्टल येथे एका नाईटक्लब बाहेर स्टोक्सशी एका व्यक्तीबरोबर मारामारी झाली होती. हे प्रकरण न्यायालयात आहे. या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होणार आहे. जर स्टोक्स या प्रकरणात दोषी आढळला तर त्याला दुसऱ्या सामन्यात खेळता येणार नाही.

टॅग्स :बेन स्टोक्सभारत विरुद्ध इंग्लंड