Join us

India vs England Test: भारतीय क्रिकेटपटूंसाठी खूशखबर; पत्नीला भेटा, पण...

India vs England Test: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांपर्यंत भारतीय खेळाडूंना आपापल्या पत्नींपासून दूर राहण्यास बजावले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 17:54 IST

Open in App

लंडन - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांपर्यंत भारतीय खेळाडूंना आपापल्या पत्नींपासून दूर राहण्यास बजावले होते. या मालिकेत संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर खेळाडूंच्या पत्नींवर टीका करण्यात येते, हीच बाब लक्षात घेता BCCIने हा निर्णय घेतला होता. मात्र, BCCI हा नियम शिथिल करण्याच्या विचारात आहे. 

इंग्लंडविरूद्धच्या टी-20 आणि नंतर वन डे मालिकेत भारतीय खेळाडूंच्या पत्नींही संघासोबत होत्या. वन डे मालिकेनंतर विश्रांतीच्या दिवसांत ब-याच क्रिकेटपटूंनी सहपत्नी इंग्लंड भ्रमंतीही केली. मात्र, एसेक्सविरूद्धचा सराव सामना सुरू होण्यापूर्वी खेळाडूंना आपल्या पत्नींपासून दूर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, मंडळाने या नियमात बदल केला असून कसोटी मालिकेच्या पहिल्या दोन आठवड्यानंतर खेळाडूंना कोणतेही 14 दिवस आपल्या पत्नींना भेटण्याची मुभा मिळणार आहे.

" 45 दिवसांच्या या दौ-यात खेळाडू व त्यांच्या पत्नींसाठी कोणताही एक ठराविक कालावधी BCCI ला निश्चित करायचा नाही. कदाचित तो सर्वांसाठी जमेलच असे नाही. त्यामुळेच या दौ-यातील दोन आठवड्यानंतर कोणतेही 14 दिवस पत्नी खेळाडूंना भेटू शकतील," असे बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितले आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 1 ऑगस्टपासून बर्मिंगहॅम येथे खेळवण्यात येणार आहे. दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 9 व 18 ऑगस्टपासून सुरू होईल, तर चौथी कसोटी 30 ऑगस्ट आणि पाचवी कसोटी 7 सप्टेंबरपासून सुरू होईल. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीक्रिकेटक्रीडा