Join us

India Vs England Test : मी काय करायचं ते मला शिकवू नका, कोहलीचा स्ट्रेट ड्राइव्ह...

मला नेमके काय करायचे आहे, ते मला माहिती आहे. त्यामुळे मला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यावर मी लक्ष केंद्रीत केले आहे, असे कोहली म्हणाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 20:35 IST

Open in App
ठळक मुद्देआपल्या आक्रमक शैलीत कोहलीने शाब्दिक स्ट्रेट ड्राइव्ह लगावला आहे. 

लंडन : इंग्लंडच्या कसोटी मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीने काय करावं आणि काय करू नये, याबाबत बरेच जण सल्ले देत आहेत. या साऱ्या गोष्टींना कोहली वैतागला आहे. या गोष्टींवर आपल्या आक्रमक शैलीत कोहलीने शाब्दिक स्ट्रेट ड्राइव्ह लगावला आहे. 

पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला कोहलीची इंग्लंडमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी कोहलीने बेधडकपणे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कोहली यावेळी म्हणाला की, " मला नेमके काय करायचे आहे, ते मला माहिती आहे. त्यामुळे मला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यावर मी लक्ष केंद्रीत केले आहे. या मालिकेत माझ्याकडून जेवढ्या जास्त धावा होतील, त्या करण्याचा माझा प्रयत्न असेल. " 

पाहा कोहलीचा व्हिडीओ

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध इंग्लंड