India vs England Test: दिनेश कार्तिकचा होऊ शकतो पत्ता कट

कार्तिकच्या जागी रिषभ पंतला संघात स्थान मिळू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 16:25 IST2018-08-14T16:23:56+5:302018-08-14T16:25:09+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs England Test: Dinesh Karthik can be out from third test | India vs England Test: दिनेश कार्तिकचा होऊ शकतो पत्ता कट

India vs England Test: दिनेश कार्तिकचा होऊ शकतो पत्ता कट

ठळक मुद्देकार्तिकला दोन कसोटी सामन्यांतील चार डावांमध्ये फक्त 21 धावाच करता आल्या आहेत.

लंडन : इंग्लंडविरुद्धचा तिसरा सामना जर भारताने गमावला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी संघात काही बदल करण्यात येणार आहे. तिसऱ्या सामन्यासाठी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकचा पत्ता कट होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

वृद्धिमान साहा जायबंदी असल्याने इंग्लंड दौऱ्यासाठी कार्तिक आणि रिषभ पंत या दोन यष्टीरक्षकांची निवड करण्यात आली. कार्तिककडे अनुभव असल्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये संधी देण्यात आली. पण कार्तिकने दोन्ही सामन्यांमध्ये निराश केले आहे.

दोन्ही सामन्यांत कार्तिककडून चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळाले नाही. त्याच्याकडून बरेच झेल सुटले. त्याचबरोबर फलंदाजीमध्येही त्याला चमक दाखवता आली नाही. कार्तिकला दोन कसोटी सामन्यांतील चार डावांमध्ये फक्त 21 धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे त्याची कामगिरी पाहता तिसऱ्या सामन्यासाठी त्याला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. कार्तिकच्या जागी रिषभ पंतला संघात स्थान मिळू शकते.

Web Title: India vs England Test: Dinesh Karthik can be out from third test