Join us

India vs England Test: भुवनेश्वर कुमार संपूर्ण मालिकेला मुकणार

India vs England Test: भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 13:50 IST

Open in App

मुंबई - भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागणार आहे. भारताने इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी पहिल्या तीन सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आला होता. उर्वरित दोन सामन्यांसाठी भुवनेश्वरचा संघात समावेश होईल असे वाटले होते, परंतु भुवनेश्वर अद्याप पूर्णपणे तंदुरूस्त झालेला नाही, त्यामुळे या मालिकेत त्याला खेळता येणार नाही.

भुवनेश्वर सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखातीतून सावरण्यासाठी मेहनत घेत आहे, मात्र कसोटी खेळण्यासाठी तो तंदुरूस्त नाही. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी संघ जाहीर करताना BCCI ने उर्वरित दोन सामन्यांसाठी भुवनेश्वरच्या समावेशाची आशा व्यक्त केली होती, परंतु ते शक्य नाही. मात्र, भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. जस्प्रीत बुमरा तंदुरूस्त झाला असून तो तिसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता आहे. 

भारताला पहिल्या दोन कसोटींमध्ये मानहानिकारक पराभव पत्करावा लागला आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघ 0-2ने पिछाडीवर असून मालिका वाचवण्यासाठी त्यांना तिसऱ्या सामन्यात कमबॅक करावे लागणार आहे. फलंदाजांचे अपयश ही भारतासाठी मोठी डोकेदुखी आहे. 

टॅग्स :भुवनेश्वर कुमारभारत विरुद्ध इंग्लंडक्रीडाक्रिकेट