Join us

India vs England Test: तिसऱ्या कसोटी सामन्यालाही बेन स्टोक्स मुकण्याची शक्यता

गेल्या वर्षी नाईटक्लबमध्ये झालेल्या हाणामारीनंतर स्टोक्सवर खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी अजूनही सुरु आहे. या सुवानवणीच्या वेळी फिर्यादी पक्षाचे वकिल निकोलस कोर्सेलिन यांनी स्टोक्सवर काही आरोप केले आहेत. पण या आरोप बिनबुडाचे असल्याचे स्टोक्सने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 17:34 IST

Open in App
ठळक मुद्देयाप्रकरणी जर स्टोक्स दोषी आढळला तर त्याची कारकिर्द धोक्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे.

लंडन : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा भारत विरुद्ध इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्टोक्सवर सध्या खटला सुरु आहे. या खटल्याची सुनावणी अजून सुरु आहे. त्यामुळे सुनावणी पूर्ण होईपर्यंत स्टोक्सला इंग्लंडकडून खेळता येणार नाही.

गेल्या वर्षी नाईटक्लबमध्ये झालेल्या हाणामारीनंतर स्टोक्सवर खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी अजूनही सुरु आहे. या सुवानवणीच्या वेळी फिर्यादी पक्षाचे वकिल निकोलस कोर्सेलिन यांनी स्टोक्सवर काही आरोप केले आहेत. पण या आरोप बिनबुडाचे असल्याचे स्टोक्सने म्हटले आहे. या खटल्याचा निकाल अजून लागलेला नाही. एका आठवड्यानंतर या प्रकरणाचा निकाल लागू शकेल, असे म्हटले जात आहे.

गेल्या आठवड्यामध्ये स्टोक्सवरील खटल्याची सुनावणी होणार होती. पण ही सुनावणी लांबत गेली. एका आठवड्यात या खटल्याची सुनावणी पूर्ण होईल, असे म्हटले गेले होते. पण अजूनही या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊ शकलेली नाही. याप्रकरणी जर स्टोक्स दोषी आढळला तर त्याची कारकिर्द धोक्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडबेन स्टोक्स