India vs England: १९७१नंतर टीम इंडियाला ओव्हलवर मिळवता आला नाही कसोटी विजय, ५० वर्षांचा दुष्काळ संपवणार का विराट कोहली?

India vs England: लिड्स कसोटीत टीम इंडिया पराभूत झाल्यानंतर मालिका १-१ अशा बरोबरीत आली आहे. लॉर्ड्सवर विजय मिळवून आनंदात असणाऱ्या विराट कोहली अँड कंपनीला तिसऱ्या कसोटीत इंग्लंडनं जमिनीवर आदळले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 03:13 PM2021-08-31T15:13:09+5:302021-08-31T15:13:48+5:30

whatsapp join usJoin us
India vs England: Team India last time won test in Kennington Oval at 1971, can virat & co. do it for this time? | India vs England: १९७१नंतर टीम इंडियाला ओव्हलवर मिळवता आला नाही कसोटी विजय, ५० वर्षांचा दुष्काळ संपवणार का विराट कोहली?

India vs England: १९७१नंतर टीम इंडियाला ओव्हलवर मिळवता आला नाही कसोटी विजय, ५० वर्षांचा दुष्काळ संपवणार का विराट कोहली?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England: लिड्स कसोटीत टीम इंडिया पराभूत झाल्यानंतर मालिका १-१ अशा बरोबरीत आली आहे. लॉर्ड्सवर विजय मिळवून आनंदात असणाऱ्या विराट कोहली अँड कंपनीला तिसऱ्या कसोटीत इंग्लंडनं जमिनीवर आदळले. जो रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडनं तिसरी कसोटी १ डाव व ७६ धावांनी जिंकली. भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीला २ सप्टेंबरपासून ओव्हल येथे सुरूवात होणार आहे आणि दोन्ही संघ तेथे दाखल झाले आहेत. या सामन्यापूर्वी इंग्लंडच्या ताफ्यात ख्रिस वोक्स, सॅम बिलिंग आणि मार्क वूड हे तगडे खेळाडू परतले आहेत आणि त्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. त्यामुळे टीम इंडियाची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. अशात केनिंग्टन ओव्हल येथील कसोटी सामन्यांचा इतिहास टीम इंडियाच्या विरोधात आहे.

बीसीसीआय होणार मालामाल, IPL 2022 तून कमावणार ५००० कोटी; नव्या संघासाठी मागताऐत २००० कोटी!

चौथ्या कसोटीत टीम इंडिया कोणत्या बदलांसह मैदानावर उतरणार याची सर्वांना उत्सुकता आहे. तिसऱ्या सामन्यात रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती. त्याच्या खेळण्याबाबद प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे आर अश्विनला संधी मिळण्याची शक्यताही बळावली आहे. इशांत शर्माच्या जागी शार्दूल ठाकूरही खेळेल, असा अंदाज व्यक्त  केला जात आहे. विराट कोहलीला अंतिम ११ फायनल करण्यापूर्वी नीट विचार करावा लागणार आहे, कारण भारतीय संघाचा ओव्हलवरील इतिहास फार चांगला नाही. १९७१ मध्ये भारतानं येथे एकमेव विजय मिळवला आहे. भारतानं १३ सामन्यांत पाच सामने गमावले आहेत आणि सात अनिर्णित निकाल लागले आहेत. २००७, २०१४ व २०१८ या मागिल तीनही मालिकांमधील ओव्हलवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे.


५० वर्षांपूर्वी मिळवला होता विजय!
१९७१ च्या सामन्यात अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली ओव्हलवर पराक्रम घडला होता. इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना अॅलन क्नॉट ( ९०), जॉन जेमसन ( ८२) व रिचर्ड हटन ( ८१) यांच्या दमदार खेळाच्या जोरावर ३५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव २८४ धावांवर गडगडला दिलीप सरदेसाई ( ५४) व फारूख इंजिनियर ( ५९) यांची अर्धशतकं व अजिक वाडेकर (  ४८) व एकनाथ सोलकर ( ४४) यांच्या खेळीनं टीम इंडियाला सावरले. भागवत चंद्रशेखर यांनी ३८ धावांत ६ विकेट्स घेत इंग्लंडचा दुसरा डाव १०१ धावांवर गुंडाळला. भारतानं १७४ धावांचे लक्ष्य ६ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. वाडेकर ( ४५), सरदेसाई ( ४०), गुंडप्पा विश्वनाथ ( ३३) व फारूख इंजिनियर ( २८) यांनी दमदार खेळ केला. 

Web Title: India vs England: Team India last time won test in Kennington Oval at 1971, can virat & co. do it for this time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.