बीसीसीआय होणार मालामाल, IPL 2022 तून कमावणार ५००० कोटी; नव्या संघासाठी मागताऐत २००० कोटी!

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाच्या कामाला लागली आहे.

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाच्या कामाला लागली आहे. IPL 2022त दोन नवीन संघाच्या समावेशाला बीसीसीआयनं ग्रीन सिग्नल दाखवला असून बीसीसीआयला ५००० कोटींचा धनलाभ होणार आहे.

इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात ८ ऐवजी १० संघ खेळणार आहेत. दोन नव्या संघांसाठीची लिलाव प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे. ''७५ कोटी मोजून कोणतीही कंपनी लिलावाचे कागदपत्र खरेदी करू शकतात. सुरूवातीला नव्या संघाची मुळ किंमत ही १७०० कोटी असावी असा विचार सुरू होता, परंतु आता ती २००० कोटी ठेवण्यात आली आहे,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी PTIला सांगितले.

आयपीएलमच्या पुढील पर्वातून बीसीसीआयला ५००० कोटींचा फायदा होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. ''बीसीसीआयला पुढील पर्वातून ५००० कोटींच्या फायद्याची अपेक्षा आहे. आयपीएलच्या पुढील पर्वात ७४ सामने खेळवले जातील,''असेही सांगण्यात आले.

ज्या कंपनीचे वार्षिक टर्नओव्हर ३००० कोटी इतके आहे त्यांनाच बोली लावता येणार आहे. एका संघ खरेदी करताना तीनपेक्षा अधिक कंपनींना एकत्र येता येणार नाही

अहमदाबाद, लखनौ व पुणे या तीन नव्या शहरांची चर्चा आहे. अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियम आहे, लखनौ येथे एकाना स्टेडियम आहे आणि त्यांची प्रेक्षकक्षमता अधिक आहे. अदानी ग्रूप, RPG संजीव गोएंका ग्रूप, टोरेंट फार्मा कंपनी यांची नावं चर्चेत आहेत.