टी-२० विश्वचषकाचा थरार आता अंतिम टप्प्यात आला असून, संपूर्ण जगाचे लक्ष भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील हाय-व्होल्टेज उपांत्य फेरीच्या (सेमीफायनल) सामन्याकडे लागले आहे. ५ मार्च रोजी होणाऱ्या या निर्णायक लढतीसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. वानखेडे स्टेडियमवर हा सामना पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक गर्दी करण्याची शक्यता असली, तरी स्टेडियमचे तिकीट न मिळालेल्या चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. मुंबईतील तब्बल २९ थिएटर्समध्ये हा सामना लाईव्ह दाखवला जाणार आहे.
स्टेडियममधील गर्दी आणि तिकिटांच्या लांबच लांब रांगांपासून सुटका व्हावी, यासाठी मुंबईतील विविध भागांतील २९ सिनेमागृहांमध्ये या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. यामध्ये हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांच्या समालोचनासह स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तिकिटांचे दर १५० रुपयांपासून ते १५५० रुपयांपर्यंत आहेत. या सामन्याची तिकिटे प्रेक्षक झोमॅटो अॅपद्वारे सहज बुक करू शकतात.
भारत- इंग्लंड सेमीफायनल: लाईव्ह स्क्रिनिंग (हिंदी)
१) मेट्रो आयनॉक्स सिनेमा, एमजी रोड
२) आयमॅक्स, वडाळा
३) पीव्हीआर ओडियन, घाटकोपर
४) पीव्हीआर, सी अँड बी स्क्वेअर, चकाला
५) पीव्हीआर, मार्केट सिटी, कुर्ला
६) पीव्हीआर सिटी मॉल, अंधेरी
७) मिरज सिनेमा, अनुपम मॉल, गोरेगाव
८) आयनॉक्स रघुलीला मॉल, वाशी
९) पीव्हीआर इन्फिनिटी, मालाड
१०) पीव्हीआर मिलाप, कांदिवली
११) यनॉक्स, पाम बीच गॅलेरिया, वाशी
१२) मिरज सिनेमा,आर मॉल, मुलुंड
१३) देवगण सिनेक्स, मुलुंड
१४) मेसन पीव्हीआर, जिओ वर्ल्ड ड्राइव्ह, बीकेसी
१५) पीव्हीआर ओरियन मॉल, पनवेल
१६) आयनॉक्स, रघुलीला मेगा मॉल, कांदिवली
१७) पीव्हीआर, लोढा एक्सपिरिया, पलावा
१८) आयनॉक्स, ठाकूर मॉल, दहिसर
१९) पीव्हीआर कॅपिटल मॉल, नालासोपारा
२०) मिरज सिनेमा, नालासोपारा
भारत- इंग्लंड सेमीफायनल: लाईव्ह स्क्रिनिंग (इंग्रजी)
१) आयएनओएक्स लेसरप्लेक्स सीआर२, नरिमन पॉइंट
२) पीव्हीआर आयकॉन, फिनिक्स पॅलेडियम, लोअर परेल
३) आयएनओएक्स इन्सिग्निया, अॅट्रिया मॉल
४) आयएनओएक्स आर सिटी, घाटकोपर
५) पीव्हीआर डायनामिक्स, जुहू
६) एचडीएफसी मिलेनिया पीव्हीआर आयकॉन, ओबेरॉय मॉल, गोरेगाव
७) पीव्हीआर आयकॉन, अंधेरी
८) आयएनओएक्स मेगाप्लेक्स, इनॉर्बिट मॉल, मालाड
९) आयएनओएक्स कोरम मॉल, ठाणे
मोठ्या पडद्यावर सामना पाहण्याचा अनुभव हा एखाद्या स्टेडिअमसारखाच असतो. साऊंड सिस्टीम आणि मोठ्या स्क्रीनमुळे चाहत्यांना प्रत्येक चेंडूचा थरार जवळून अनुभवता येणार आहे. ५ मार्चला होणाऱ्या या सामन्यासाठी आतापासूनच बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.